Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुक्यात स्वतंत्र विभागीय कार्यालय आणि वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय लवकरच सुरू होणार : आमदार राहुल कुल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 September 2022, 9:40

राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील स्वतंत्र प्रांत कार्यालय व वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. दोन्ही कार्यालये लवकरच सुरू होऊन दौंडच्या विकासाला गती देणार आहेत. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.

उंडवडी (ता. दौंड) येथे ग्रामपंचायत व आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून सुमारे १ कोटी ७० लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी बोलताना वरील माहिती कुल यांनी दिली आहे. यावेळी भाजपा नेते तानाजी दिवेकर, भीमापाटस चे संचालक माणिक  कांबळे, उंडवडीच्या सरपंच दिपमाला जाधव, उपसरपंच  विकास  कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार राहुल कुल म्हणाले, खामगाव – पिंपळगाव या रस्त्याच्या चालू कामासाठी चांगल्या प्रकारे निधी मिळालेला असून हे काम देखील लवकरच पूर्ण करण्यात येईल. गेल्या अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमुळे तालुक्यातील तसेच राज्यातील अनेक विकास कामांना मर्यादा येत होत्या. पण आता शिंदे फडणवीस सरकार आल्यामुळे दौंड तालुक्यातील विकास कामांना गती मिळणार आहे.

 

प्रामुख्याने टाटा मुळशी धरणाचे पाणी मुळा मुठा पात्रामध्ये वळवण्याच्या कामाला गती मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे २०१९ मध्ये मंजूर झालेल्या प्रांत कार्यालयाला निधी मिळाला नाही पण आता प्रांत कार्यालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय हे लवकरात लवकर सुरू करून तालुक्यातील जनतेला करावी लागणारी पायपीट कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

त्याचबरोबर दौंड तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे ३३ कोटी रुपयांचे काम दौंड शहरामध्ये चालू आहे. अनेक राखलेल्या कामांना गती देऊन ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी व उंडवडी गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे. असे आमदार कुल यांनी सांगितले.

यावेळी राहूचे सरपंच दिलीप देशमुख, सुभाष यादव, रवींद्र होले, पांडुरंग आखाडे, दत्तात्रय आखाडे, विशाल भोसले, शामराव दोरगे, संभाजी नातू, , उंडवडी ग्रामपंचायतचे सदस्य मैना गुंड, विमल जाधव, सुनील नवले,पोलीस पाटील राजेंद्र जगताप, मा. तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड, माजीसरपंच विकास सोनवणे, माजी उपसरपंच लक्ष्मण भंडलकर, माजी सरपंच मुरलीधर भोसले, पाणीपुरवठा अध्यक्ष संपत टिळेकर, रोहिदास जाधव, रवी पांढरे, भिकू कांबळे आणि सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे यांनी केले तर आभार उपसरपंच विकास कांबळे यांनी मानले

उंडवडी येथे भुमिपुजन व लोकार्पण करण्यात आलेली कामे व रक्कम पुढील प्रमाणे
१) उंडवडी गावठाण नळ पाणी पुरवठा योजना – १ कोटी १६ लक्ष रुपये
२) उंडवडी गावठाण अंतर्गत बंदिस्त गटर लाईन – १५ लक्ष रुपये
३) ग्रामपंचायत उंडवडी बहुउद्देशीय सभागृह  १५ लक्ष रुपये
४) जि. प. प्राथ. शाळा भोसलेवाडी इमारत  – ०८ लक्ष रुपये

५) जि.प.प्राथ. शाळा गावठाण इमारत –  ०८ लक्ष रुपये
६) भोसलेवाडी स्मशानभुमी सुशोभिकरण  – ०३ लक्ष रुपये
७) उंडवडी गावठाण जलशुद्धीकरण खोली – २.५ लक्ष रुपये
८) जि.प.प्राथ. शाळा सांस्कृतिक स्टेज भोसलेवाडी – १.२३ लक्ष रुपये
९) जि.प.प्राथ. शाळा सांस्कृतिक स्टेज उंडवडी गावठाण – १.२३ लक्ष रुपये

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

पोलिस कर्मचाऱ्याचे अफेअर उघडकीस आणले युवा किर्तनकाराने, ...म्हणून झालेल्या त्रासामुळे किर्तनकाराने आत्महत्या केल्याची बहिणीची इंदापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.