Raj Thackeray : राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा माहोल रंगला आहे. पुढे लवकरच महापालिका निवडणुका होण्याचीही शक्यता आहे. पण या सर्व प्रक्रियेत मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचा आरोप विरोधक सतत करत आहेत. सोबतचं सत्ताधाऱ्याचे उमेदवार बिनविरोध कसे निवडूण येताय याबाबत देखील चर्चा रंगल्या आहे. दरम्यान आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही याच मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते मुंबईतील कोकण महोत्सवात बोलत होते. raj thackeray

काय म्हणाले राज ठाकरे ?
रात्र वैऱ्याची आहे… गाफील राहू नका. आजूबाजूला लक्ष ठेवा. राजकारणात जे चाललंय, मतदार याद्यांमध्ये जी चाळे चालू आहेत, त्यावर लक्ष ठेवा. मतदार खरे आहेत की खोटे—हे पाहणं खूप आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची ठरू शकते. आपण गाफील राहिलो, तर महापालिका हातातून जाईल. आणि ती गेली तर हे लोक थैमान घालतील.
मनसे–शिवसेना (ठाकरे गट) युतीची चर्चा
मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युतीची चर्चा सुरू आहे. जागावाटपावरही चर्चा चालू असल्याची माहिती आहे. परंतु काँग्रेसने मात्र मनसेसोबत युतीचा प्रस्ताव थेट नाकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे मात्र मनसेसोबत युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे.







