Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : मंत्रिमंडळ विस्तारात आमचं हेलिकॉप्टर लॅन्ड झालं तर… महादेव जानकरांचा सरकारला इशारा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 26 June 2023, 17:04

Political News : नाशिक : आम्हाला जागा द्या, असे आम्ही भाजपला म्हणणार नाही. त्यांनी स्वतःहून आम्हाला जागा द्याव्यात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद हवं आहे, अशी अपेक्षा महादेव जानकर यांनी व्यक्त केली. आमचं हेलिकॉप्टर जर लॅन्ड झालं तर, आम्ही आमची जागा दाखवून देऊ, असंही त्यांनी म्हटलं. या विधानाची सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा होत आहे.(Political News)

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार वर्षभरापासून रखडला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार वर्षभरापासून रखडला आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळात आपल्याला योग्य स्थान मिळेल, अशी अनेकांची अपेक्षा आहे. रासप पक्षाकडूनही मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा बोलून दाखवण्यात आली आहे.(Political News)

मी इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मी प्रॅक्टिकल वागतो. ज्याच्यामागे लोक आहेत, त्याला सोडायचं आणि ज्याच्या मागे कुणीही नाही, त्याला घ्यायचं, असं भाजपचं सध्याचं धोरण आहे. त्यांना कपालेश्वर बुद्धी देवो, (Political News)असं म्हणत महादेव जानकर म्हणाले की, भाजपला मित्र पक्षाची गरज आहे. पण त्यांनी मित्र पक्षाची वाट लावली आहे. त्यामुळेच आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महादेव जानकर बंड करण्याच्या तयारीत तर नाही ना, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

 

आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करून शेवटी आमचा आमदार निवडून आणला. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार सांगणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घेतलं नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत; पण आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही. मी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो. आम्ही म्हणतो एनडीएमध्ये आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. ज्यावेळी माझे ५० आमदार असतील, त्यावेळी मी बोलेन, असंही महादेव जानकर म्हणाले.(Political News)

भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. त्यांच्यावर आम्ही नाराज नाही, राग देखील नाही. मी स्वतःला सांगतो, की महादेव जानकर स्वतःला मोठा कर… त्यावेळी मीडिया देखील मागे येईल, असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला आहे.(Political News)

दरम्यान, पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षाने दिलेल्या ऑफरविषयी बोलताना जानकर म्हणाले की, पंकजा मुंडे माझी बहीण आहे. त्या एका पक्षाच्या सचिव आहेत. त्या हुशार आहे. त्यामुळे त्या योग्य तो निर्णय घेतील. मी सल्ला देण्याइतपत मोठा नाही.(Political News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Pune News : लोणीकंद आणि हडपसर वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.