Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवसेना पक्षचिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सर्वोच्च न्यायालयात सलग पाचव्या दिवशी जोरदार युक्तिवाद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 13 August 2026, 15:24

पुणे : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारक्षेत्राच्या मर्यादा ओलांडून एकनाथ शिंदे यांच्या गटाला लाभ मिळवून देणारा निर्णय घेतल्याचा दावा सिब्बल यांनी केला. शिवसेना पक्षाच्या घटनेचा आणि संघटनात्मक रचनेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचे न्यायालयासमोर मांडले.

सिब्बल यांनी सलग पाचव्या दिवशी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद केला. 2018 मधील शिवसेनेच्या पक्षघटनेवर एकनाथ शिंदे यांनी बंडापूर्वी कोणताही आक्षेप घेतला नव्हता. त्याच घटनेनुसार ते पक्षात आमदार आणि मंत्री झाले होते. मात्र, 2022 मध्ये बंड झाल्यानंतर त्यांनी हीच घटना मान्य नसल्याचे सांगितले. मग 2018 ची घटना मान्य नव्हती, तर त्यावेळी आक्षेप का घेतला नाही, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला.

शिंदे यांनी स्वतःची वेगळी कार्यकारिणी कोणत्या आधारावर स्थापन केली, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पक्षाच्या घटनेनुसार संघटनात्मक निवडणुका झाल्या होत्या आणि त्या रचनेचा शिंदे गटाने अनेक वर्षे स्वीकार केला होता. त्यामुळे अचानक 2018 ची घटना लोकशाहीविरोधी असल्याचा दावा करणे योग्य नसल्याचे सिब्बल यांनी म्हटले.

निवडणूक आयोगाने शिवसेना प्रकरणात जनता दलाच्या 1994 मधील निर्णयाचा आधार घेतला होता. मात्र, जनता दल आणि शिवसेनेच्या प्रकरणातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. जनता दलामध्ये पक्षाची संघटनात्मक रचना तदर्थ पद्धतीने चालत होती. शिवसेनेच्या बाबतीत मात्र संघटनात्मक निवडणुका झाल्या होत्या आणि पक्षाची रचना निश्चित होती, असे त्यांनी सांगितले.

 

आयोगाने कोणतीही पूर्वसूचना न देता शिवसेनेची 2018 ची पक्षघटना अलोकतांत्रिक असल्याचा निष्कर्ष काढला आणि त्याचा वापर पक्ष व चिन्हाच्या वादात केला, असा आक्षेपही सिब्बल यांनी घेतला. त्यामुळे आयोगाचा निर्णय आणि त्यामागील प्रक्रिया न्यायालयाने तपासावी, अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

Thursday, 13 August 2026, 17:07

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thursday, 13 August 2026, 17:02

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’च्या दोन रेक दाखल; लवकरच होणार ट्रायल रन

Thursday, 13 August 2026, 16:37

बायको रक्ताच्या थारोळ्यात पडून ओरडत राहिली अन् तो पसार झाला! चारित्र्याच्या संशयावरून भररस्त्यात नवरा-बायकोचा तुफान राडा

Thursday, 13 August 2026, 16:13

शिरुर बायपास बनला ‘मृत्यूचा सापळा’; अनधिकृत दुभाजक, भरधाव वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला

Thursday, 13 August 2026, 15:35

शिवसेना पक्षचिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सर्वोच्च न्यायालयात सलग पाचव्या दिवशी जोरदार युक्तिवाद

Thursday, 13 August 2026, 15:24
Next Post

शिरुर बायपास बनला ‘मृत्यूचा सापळा’; अनधिकृत दुभाजक, भरधाव वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.