Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Amol Kolhe : शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांना दुखापत ; १ मे रोजीचा प्रयोग सादर करण्याचा निर्धार व्यक्त..

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 May 2023, 10:28

Amol Kolhe पुणे – छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

 

अमोल कोल्हे यांच्या मणक्याला दुखापत…

कराडमधील कल्याणी मैदानावर २८ एप्रिलपासून ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत. कालच्या प्रयोगादरम्यान संभाजी महाराजांच्या वेषातील डॉ. कोल्हे घोड्यावरुन एन्ट्री घेत असताना घोड्याचा मागील पाय अचानक दुमडला आणि त्यामुळे पाठीला जर्क बसून त्यांच्या मणक्याला दुखापत झाली.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

मात्र त्या परिस्थितीतही डॉ. कोल्हे यांनी वेदनाशामक औषधे घेऊन चेहऱ्यावर दुखापतीचा भाव उमटू न देता जिद्दीने प्रयोग सादर केला. मात्र उर्वरीत प्रयोग रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली. परंतु १ मे हा महाराष्ट् राज्याचा स्थापना दिवस. या दिवसाचे औचित्य आणि महत्व वेगळं आहे. त्यामुळे दुखापत झाली असली तरी १ मे रोजीचा प्रयोग करण्याचा निर्धार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. मात्र उर्वरीत दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे दुखापतीमुळे रद्द करावे लागणार असले तरी ११ मे पासून पिंपरीतील एच.ए. मैदानावरील प्रयोग तितक्याच तडफेने सादर केले जाणार आहेत.

या संदर्भात डॉ. कोल्हे म्हणाले की, पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्याने पाठीतून तीव्र कळा जाणवत आहेत. त्यामुळे १ मे रोजीचा प्रयोग संपल्यावर मुंबईत जाऊन उपचार घेणार असून पुन्हा नव्या जोमाने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज होणार आहे. त्यामुळे पुरेशी विश्रांती व उपचार घेऊन पिंपरी चिंचवड येथील एच. ए. मैदानावर ११ ते १६ मे कालावधीत होणारे ‘शिवपुत्र संभाजी’महानाट्याचे प्रयोग ठरल्याप्रमाणे होतील असे त्यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

Pune Crime : दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याच्या किरकोळ कारणावरून एकाचा कोयत्याने वार करून खून ; मुंढवा परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.