Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इस्रायल-इराण संघर्षामुळे भारताला महागाईचा चटका? पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 June 2025, 10:45

मुंबई: इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे, तसेच त्यात अमेरिकेच्या सहभागामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या अस्थिरतेचे थेट परिणाम आता भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि अगदी घरगुती गॅसचे दरही वाढण्याची शक्यता असल्याने, सर्वसामान्यांच्या बजेटवर लवकरच मोठा ताण येणार आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमालीचे वधारले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत एकाच दिवसात तब्बल ५.७ टक्क्यांनी वाढ झाली. जगातील प्रमुख तेल आयातदार देशांपैकी एक असलेल्या भारतासाठी ही चिंतेची बाब आहे, कारण जागतिक बाजारातील प्रत्येक दरवाढचा परिणाम थेट ग्राहकांवर होतो.  त्यामुळे येत्या काही दिवसांत पंपवर इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

फक्त इंधनाची दरवाढ नव्हे एकूण खर्चावरही याचा परिणाम होणार आहे. गॅसचे दरही वाढण्याची शक्यता असल्याने, घरगुती बजेट विस्कळीत होण्याची भीती आहे. या संघर्षाचा होर्मुझ जलमार्गावरही परिणाम होण्याची शक्यता आहे, जो जागतिक तेल व्यापारातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. जगातील सुमारे २०% कच्चे तेल या मार्गाने येते. जर हा मार्ग बाधित झाला, तर तेल पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण होऊन भारतासारख्या आयातदार देशांना त्याचा गंभीर फटका बसेल.

जागतिक घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारातही नकारात्मक कल दिसून येत आहे. गुंतवणूकदार सावध झाले असून, सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढल्याने त्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात खर्च आणखी वाढू शकतो. क्रूड तेल कंपन्या आणि ऑटोमोबाईल क्षेत्रावर याचा परिणाम दिसत आहे, तर संरक्षण क्षेत्रातील शेअर्स लक्ष वेधून घेत आहेत.

विश्लेषकांच्या मते, हा संघर्ष जर दीर्घकाळ चालला, तर भारतात केवळ इंधनाचे दरच नव्हे, तर खाद्यपदार्थ, वाहतूक खर्च आणि एकूणच महागाई वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सध्या दरवाढ टाळण्यासाठी प्रयत्न केले असले तरी, इंधन कंपन्यांवरील दबाव वाढत आहे. त्यामुळे, इस्रायल-इराणमधील हा संघर्ष भारतासाठी केवळ मुद्दा न राहता, थेट आर्थिक स्थिरतेसाठी एक मोठा धोका बनू शकतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सलमान खानने मागितली श्रद्धा कपूरची जाहीर माफी! 4 डिसेंबरला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ची टक्कर; प्रदर्शनाच्या तारखेबाबत केला मोठा खुलासा

Saturday, 21 November 2026, 9:52

‘अक्वान’ चक्रीवादळाचं संकट? राज्यात एकाच वेळी पाऊस आणि थंडीचा तडाखा! शेतकऱ्यांची चिंता वाढली

Saturday, 21 November 2026, 9:26

पुण्यात क्लास संचालकाला खंडणीसाठी धमकी! 10 लाखांची मागणी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 21 November 2026, 9:19

शिक्षिकेच्या हत्येचा कट घरच्यांनीच रचला! दीराच्या अटकेने प्रकरणाला नवं वळण; धक्कादायक कारण आलं समोर

Saturday, 21 November 2026, 9:06

आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पुण्यातील घरात चोरी! महागडी बॅग गायब, इतर वस्तूही केल्या लंपास

Saturday, 21 November 2026, 8:53

भारत-पाकिस्तान फायनल रद्द, तरी पाकिस्तानला दिली ट्रॉफी; नेमकं घडलं काय? वाचा

Saturday, 21 November 2026, 8:43
Next Post

सायकल क्लबच्या सायकप्रेमींनी भिगवण ते पंढरपूरपर्यंत ११० किमीची सायकल वारी केली पूर्ण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp