Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला झापले!’आम्ही दिलेले निर्देश पाळा अन्यथा…’, पक्ष चिन्हाबाबत कोर्टाने दिला मोठा इशारा!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 24 October 2024, 18:05

नवी दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर ‘प्रकरण न्यायप्रविष्ट’ असा उल्लेख होत नसल्याने आज शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटांना सुनावत आम्ही दिलेला सूचनांचे पालन करा, अन्यथा आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू असा इशारा दिला. अजित पवार गटाने सर्व सूचनांचे पालन करत असल्याचे सांगत प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू असं म्हटलं आहे.

 

अजित पवार गटाकडून अटींचे पालन नाही..

शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शरद पवार गटाकडून अभिषेक मणून सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला. यावेळी बोलताना अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, घड्याळ हे चिन्ह दोघांपैकी कोणालाही मिळू नये अशी आमची मागणी होती. मात्र, तुम्ही 19 मार्च रोजी हे चिन्ह बहाल करताना काही अटी घातल्या होत्या. मात्र, त्या अटींचे पालन अजित पवार गटाकडून केलं जात नाही, याकडे सिंघवी यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की अजित पवार गटाकडून सूचनांचं पालन करण्यात आलेलं नाही. तसेच शरद पवार यांच्या नावाचाही वापर होऊ नये असा आदेश होता. मात्र, घड्याळ हे चिन्ह अजूनही शरद पवार या नावाशी जोडले गेले आहे. असे त्यांनी सांगितले.

कोर्टाने सुनावाले..

जे चिन्ह कोर्टाच्या विचाराधीन आहे, तेव्हा त्याचा फायदा दोघांपैकी एकाला व्हायला नको, हे चिन्ह पक्ष फुटीपूर्वीचे असल्याचे अभिषेक सिंघवी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे चिन्हावर सर्वत्र लिहिण्यात यावे, असं कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र त्याचं पालन होत नसल्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून अजित पवारांच्या वकीलांना विचारणा करण्यात आली. तुम्ही नियमांचे पालन करत नाही का? अशी विचारणा यावेळी केली. अजित पवार गटाचे वकील बलवीर सिंग म्हणाले की, आम्ही नियमानुसार चिन्ह वापरत आहोत. सगळे फोटो शरद पवार पक्षाकडून दाखवले जात नाहीत, असा दावा यावेळी बलबीर सिंग यांनी केला.

दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करायचे आहे. असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. नाहीतर आम्ही अवमानाचा ठपका ठेवू, असा इशाराही दिला. तुम्ही दोघांनी तुम्हाला दिलेले निर्देश पाळले पाहिजेत. जर मुद्दाम निर्देशांचे उल्लंघन कोणी केलं तर आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू. यानंतर आम्ही स्वतःहून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू, असे आश्वासन अजित पवार गटाकडून यावेळी देण्यात आले आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51

राज्यात 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळाले नवे अतिरिक्त आयुक्त

Wednesday, 15 April 2026, 22:12

“आम्ही सेवा देणारे, माफिया नाही”; प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात पुण्यात टँकर व्यावसायिकांचा संप

Wednesday, 15 April 2026, 21:28

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08
Next Post

भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून ५ कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.