Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

30,209 शिक्षक पदांसाठी भरती, पण साइट ठप्प; उमेदवारांकडून मुदत वाढवून देण्याची मागणी

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 9 August 2026, 12:30

मुंबई : राज्यातील शिक्षक भरतीसाठी सध्या पवित्र पोर्टलवर उमेदवारांची मोठी गर्दी होत आहे. तब्बल 30,209 शिक्षक आणि शिक्षणसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांना 11 ऑगस्ट 2026 पर्यंत पसंतीक्रम भरून तो लॉक करायचा आहे. मात्र एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार पोर्टलवर लॉगिन करत असल्याने सर्व्हरवर ताण आला आहे. त्यामुळे अनेकांना वेबसाइट उघडण्यात अडचणी येत आहेत.

राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यालये तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त शिक्षक पदांसाठी ही भरती केली जात आहे. पात्र उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार पद आणि संस्थांचा क्रम निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

या भरतीसाठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेले 1,70,108 उमेदवार पात्र आहेत. त्यामुळे उपलब्ध जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

यापूर्वी या प्रक्रियेसाठी 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. शासनाच्या नियमानुसार रिक्त जागा आणि आरक्षणाचा विचार करून सुमारे 80 टक्के पदांवर नियुक्ती प्रक्रिया राबवली जात आहे.

 

उमेदवारांना 6 ते 11 ऑगस्ट या कालावधीत पसंतीक्रम भरायचा आहे. त्यासाठी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या पवित्र पोर्टलवर लॉगिन करून प्रथम प्राधान्यक्रम आणि त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नोंदवणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास पुढील निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

दरम्यान, पोर्टलवर वारंवार अडचणी येत असल्याने अनेक उमेदवारांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, सर्वांना पसंतीक्रम भरता यावा, यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

लाडक्या बहिणींना खुशखबर! जुलैचा हफ्ता याच आठवड्यात खात्यात जमा होणार; महत्वाची अपडेट समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp