Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमच्या कबुलीजबाबाने खळबळ, फक्त ‘या’ कारणामुळे केले होते राजाशी लग्न

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 10 June 2025, 11:55

 इंदूर: राजा रघुवंशी हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.  ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांचा मृतदेह मेघालयच्या एका निर्जन ठिकाणी आढळून आल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या तपासात, हत्येमागे राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिच मुख्य सूत्रधार असल्याचे  धक्कादायक सत्य समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि राजाची ओळख एका मॅट्रिमोनियल ॲपद्वारे झाली होती आणि अवघ्या काही महिन्यांच्या ओळखीनंतर ११ मे रोजी त्यांचे लग्न झाले. मात्र, पूर्वीपासून सोनमचे राज कुशवाह नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि हे संबंध लग्नानंतरही सुरूच राहिले. याच अनैतिक संबंधातून राजाला कायमचे संपवण्याचा भयावह कट रचला गेला. राजा रघुवंशीची हत्या करून लुटीमारीच्या उद्देशाने हत्या झाली असे भासवू. त्यानंतर मी विधवा झाल्यानंतर पप्पा राज कुशवाहसोबत लग्न करण्यास परवानगी देतील, असे सोनमला वाटत होते. त्यामुळे राजाची हत्या करण्यात आली.

 

१६ मे रोजी रचला हत्येचा कट 

लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशी, म्हणजे १६ मे रोजी सोनमने प्रियकर राज कुशवाहच्या मदतीने राजाच्या हत्येची संपूर्ण योजना आखली. राजाला हनिमूनसाठी शिलाँगला घेऊन जाण्यात आले. राजा हनिमून समजून आनंदाने प्रवासाला निघाला होता, तर दुसरीकडे सोनम मात्र त्याच्या हत्येसाठी योजना आखत होती.

सोनमने योजनेनुसार तीन जणांना आधीच गुवाहाटीला पाठवले होते. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने एक लहान कुऱ्हाड मागवली, ज्याचा वापर राजाच्या हत्येसाठी करण्यात आला.  २३ मे रोजी सोनमने राजाला ‘फोटोशूट’ करायच्या बहाण्याने  एका टेकडीवर नेले. टेकडीवर चढताना थकल्याचे नाटक करत ती मागे राहिली, योग्य संधी साधून सोनमने मागून आदेश दिला, “त्याला संपवा!” आणि त्याच क्षणी कुऱ्हाडीने राजाची निर्घृण हत्या करण्यात आली.

सोनमने आरोपींना आधी १५ हजार रुपये दिले होते. हत्येच्या वेळी आणखी ३५ हजार रुपये रोख देण्यात आले. काम पूर्ण झाल्यावर २० लाख रुपये देण्याचे आश्वासनही सोनमने दिले होते.

राजाचा खून केल्यानंतर सोनम गुवाहाटीमार्गे वाराणसी आणि नंतर गाजीपूरला पोहोचली, तिथून नेपाळमार्गे पलायनाची तयारी करत होती.  प्रियकर राज कुशवाहला इंदूरमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर सोनमने गाजीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या! अंगावर पेट्रोल ओतून संपवलं जीवन

Wednesday, 15 April 2026, 20:46

भोंदूबाबा अन् त्याच्या पोलीस पत्नीचा कारनामा! अलौकीक शक्तींच्या नावाखाली मैत्रिणीलाच फसवलं; अघोरी विधी केले, घरात आत्मा आहे सांगितलं अन्…

Wednesday, 15 April 2026, 20:08

पुणे प्राईम न्यूजच्या माजी उपसंपादीका ज्योती कदम यांचे अकाली निधन; पुणे पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

Wednesday, 15 April 2026, 19:29

पुण्याच्या पबमध्ये तरुणीचा विनयभंग! वॉशरूमबाहेर अयोग्य वर्तन करत किळसवाणा स्पर्श; तरुणीने आरडा-ओरड केली अन्…

Wednesday, 15 April 2026, 19:07

बड्या अधिकाऱ्याची खरातशी 196 वेळा फोनवर चर्चा? डेप्युटी कलेक्टर अंजली दमानियांच्या रडारवर; SIT चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 18:23

पुणे जिल्हा परिषदेचे “मिनी मंत्रालय” कार्यान्वित होणार! उद्या विषय समित्यांचे वाटप आणि 83 सदस्यांची निवड

Wednesday, 15 April 2026, 17:58
Next Post

जयंत पाटील यांचा राजीनामा? वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिले संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.