अहमदाबाद: आज (1 जून) ला मुंबई इंडियन्सचा संघ पंजाब किंग्सविरुद्ध क्वालिफायर २ सामना खेळणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मुंबईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजच्या सामन्यात मागील सामन्यात ज्या रिचर्ड ग्लीसनने साई सुदर्शनला बाद करून नेत्रदीपक कामगिरी केली होती. तो रिचर्ड ग्लीसन आज होणाऱ्या पंजाब किंग्सविरुद्ध क्वालिफायर २ सामना खेळणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुंबई संघात मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रीचर्ड ग्लीसनला गुजरातविरुद्धच्या क्वालिफायर- १ सामन्यात दुखापत झाली. तसेच दीपक चहरही फिट नसल्याने तो हा सामना खेळणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची डोकेदुखी आता वाढली आहे.
हे दोघेही मॅच विनर खेळाडू संघात नसल्याने आता मुंबईचा संघ आपला हुकमी एक्का बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. अश्या परिस्थितीत रिसी टॉपले हा मुंबई साठी हुकमी एक्का ठरू शकतो. या सामन्यात रिसी टॉपले याला संधी मिळू शकते असे म्हटले जात आहे.







