Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात भस्मा आरतीदरम्यान भीषण आग; पुजाऱ्यांसह १३ जण होरपळले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 March 2024, 9:37

मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात भस्मा आरतीदरम्यान गाभाऱ्यात भीषण आग लागली. या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण होरपळून निघाल्याची माहिती मिळत आहे. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता. त्याचवेळी होळीमध्ये गुलाल टाकल्याने आग भडकली आणि संपूर्ण गर्भगृहातील फ्लेक्सनी पेट घेतला. सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

महाकालेश्वर हे जगप्रसिद्ध मंदिर आहे. येथे रविवारी संध्याकाळी होळी उत्सवाला सुरुवात झाली. सर्वात आधी संध्याकाळच्या आरतीवेळी हजारो भाविकांनी बाबा महाकाल यांच्यासोबत गुलालाची होळी केली. त्यानंतर महाकाल प्रांगणात होलिका दहन करण्यात आले. मंदिरात सोमवारी सकाळी भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात असतानाच आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे गाभाऱ्यात उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण गाभाऱ्याबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकारामुळे गाभाऱ्यात अडकलेल्या पुजाऱ्यांसह १३ जण होरपळून निघाले.

दरम्यान, महाकालेश्वर मंदिरात होळीला बाबा महाकाल गुलाल अर्पण करतात आणि पुजारीही एकमेकांना रंग लावतात. या रंगांनी गर्भगृहाच्या भिंती खराब होऊ नयेत, यासाठी यंदा शिवलिंगावर प्लास्टिकचे फ्लेक्स लावण्यात आले होते. शिवाय गर्भगृहाच्या भिंती आणि छतावर चांदीचा लेप लावण्यात आलेला आहे. गर्भगृहात एकमेकांवर रंगांचा वर्षाव होत असताना आरतीच्या थाळीत जळणाऱ्या कापूरवर गुलाल उधळला गेला, त्यामुळे आगीने पेट घेतला आणि गर्भगृाहातील फ्लेक्सनी पेट घेतला. मात्र, काही वेळातच आग आटोक्यात आली.

या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितलं की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आगीच्या घटनेमुळे पुजाऱ्यांसह काहीजणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याची चौकशी समिती करणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ थेट 90 मिनिटांवर! नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचा मेगा प्लॅन तयार; बेंगळुरूचा प्रवासही होणार सुपरफास्ट!पुणे :

Sunday, 22 November 2026, 10:02

देवदर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा! राजस्थानच्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Sunday, 22 November 2026, 9:04

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सना FDA चा दणका! 20 ठिकाणी छापे, 8 नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित

Sunday, 22 November 2026, 8:33

पुण्यात भाजपला खिंडार! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार?

Sunday, 22 November 2026, 8:05

स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीत पीडितेला अश्रू अनावर! न्यायालयातील कामकाज तहकूब; कोर्टात नेमकं काय घडलं?

Sunday, 22 November 2026, 7:48

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Sunday, 22 November 2026, 7:30
Next Post

चाकणजवळील महाळुंगे इंगळे गावातून तरुणाचे अपहरण; तपासाची चक्रे वेगात, जुने आरोपी रडारवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp