मुंबई: महिलांचे शोषण आणि फसवणूक प्रकरणात अडकलेला भोंदूबाबा अशोक खरात याचे जाळे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नसून, थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचा ‘सीडीआर’ (Call Detail Record) जाहीर करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या यादीत सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची नावे असल्याने आता ‘खरात फाईल्स’मध्ये कुणाकुणाचे चेहरे उघड होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दमानिया यांनी पुराव्यासह केलेल्या दाव्यानुसार, रुपाली चाकणकर यांनी मागील वर्षभरात अशोक खरातला तब्बल 177 वेळा कॉल केले आहेत. खरातच्या स्वतःच्या मुलींनंतर सर्वाधिक संवाद चाकणकर यांच्याशीच झाला असून, दोघांमध्ये तब्बल 9 तास 36 मिनिटे चर्चा झाल्याचे रेकॉर्ड सांगते. चाकणकर यांच्या बहिणीनेही खरातला 236 वेळा फोन केल्याचा दावा करण्यात आला आहे.
केवळ चाकणकरच नव्हे, तर राज्याच्या सत्तेतील सर्वोच्च पदांवरील व्यक्तींचेही नाव या प्रकरणात ओढले गेले आहे:
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे: मागील वर्षभरात 17 वेळा संपर्क.
-
चंद्रकांत पाटील व सुनील तटकरे: प्रत्येकी 8 वेळा संपर्क.
-
दीपक केसरकर व आशिष शेलार: या नेत्यांनीही खरातशी संवाद साधल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी हे दावे पुराव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खरात प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







