Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू जिवंत की मृत? व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ, सरकारने दिला खुलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 March 2026, 14:37

Israel News: जगभरात इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर विविध अफवा आणि चुकीची माहिती सोशल मीडियावर वेगाने पसरताना दिसत आहे. अलीकडेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूबाबत एक अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या दाव्यांमुळे काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र इस्रायल सरकारने या सर्व बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये नेतन्याहू यांच्या हत्येचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा करत विविध प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या. त्यामुळे जगभरात या बातमीबाबत चर्चा सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर इस्रायल सरकारने अधिकृत प्रतिक्रिया देत अशा सर्व दाव्यांना फेटाळून लावले. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सुरक्षित असून त्यांच्या मृत्यूबाबत पसरवण्यात आलेली माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर या अफवांवर काही प्रमाणात पडदा पडला.

दरम्यान, नेतन्याहू यांनी स्वतः शुक्रवारी आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ते युद्धस्थितीबाबत पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतरही सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. काही वापरकर्त्यांनी या व्हिडिओमध्ये त्यांच्या हाताला सहा बोटे दिसत असल्याचा दावा करत हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असावा असा संशय व्यक्त केला.

याच दरम्यान अमेरिकेतील काही राजकीय विश्लेषकांनीही सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले. अमेरिकन कमेंटेटर कॅन्डेस ओवेन्स यांनी एक्सवर पोस्ट करत नेतन्याहू कुठे आहेत असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा अधिक वाढली. मात्र अधिकृत स्तरावर नेतन्याहू सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Pune Crime: 'I will get you a house' lured a woman into a trap; Showed her the dream of a house in Pune and then extorted money...

Pune Crime: 'मी तुम्हाला घर मिळवून देतो' महिलेला जाळ्यात ओढलं; पुण्यात घराचं स्वप्न दाखवलं अन् पैसे उकळून भामट्याने...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.