Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

India-Japan Akhand Bharat Festival: टोकियोच्या भूमीत घुमला “जय भवानी, जय शिवाजी”चा जयघोष! जपानमध्ये महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची वर्षपूर्ती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 11 March 2026, 7:33

जपान: जपानची राजधानी टोकियो येथे 8 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित भारत-जपान अखंड भारत महोत्सव (India-Japan Akhand Bharat Festival) मोठ्या उत्साहात पार पडला. ऑल जपान (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) असोसिएशन्स ऑफ इंडियन्स, एदोगावा इंडिया कल्चर सेंटर आणि अमरवाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. टोकियोतील भारतीय समुदायासह जपानी नागरिकांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग नोंदवली असल्याची माहिती श्री.केशव विद्वांस (विश्वस्त,चिंचवड देवस्थान ट्रस्ट) यांनी दिली.

टोकियो येथील भारतीय वंशाचे आमदार योगेंद्र पुराणिक (योगी) यांच्या संस्थेच्या पुढाकारातून मागील वर्षी 8 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. त्या पुतळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त यंदा विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम, चर्चासत्रे आणि भारतीय परंपरेचे दर्शन घडवणारे सोहळे आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाला अमरवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश मदनजी गोसावी, जपान सरकारचे प्रतिनिधी टागा मसायुकी, एदोगावा प्रांताच्या आमदार युमिको मामिया आणि जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलच्या संचालक निर्मल जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भारतातून 30 पेक्षा अधिक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक ढोल-ताशा वादनाने झाली. त्यानंतर लेझीम पथक, वारकरी मंडळी आणि पालखी सोहळ्याचे सादरीकरण करण्यात आले. भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समुदायांनीही आपापल्या सांस्कृतिक परंपरांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत जपानी पारंपारिक ढोल वादनाचाही समावेश करण्यात आला होता, ज्यामुळे दोन्ही देशांच्या संस्कृतींचे सुंदर दर्शन घडले.

या महोत्सवात ‘टोकियो निरंतर संमेलन’ या उपक्रमाअंतर्गत धर्म आणि संस्कृती विषयावर चर्चासत्रही आयोजित करण्यात आले. शिंतो, बौद्ध आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधी तसेच धर्मगुरूंनी भारतीय संतपरंपरा, साहित्य आणि सांस्कृतिक वारसा यावर विचार मांडले.

यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की, जपानसारख्या देशात विविध प्रांतांतील भारतीयांना एकत्र आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणादायी प्रतीक आहे. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजात एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमान टिकून राहतो. अशा कार्यक्रमांमुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्यास मदत होते, तसेच भारतीय परंपरा आणि इतिहासाची ओळख जगभर पोहोचवण्यासही हातभार लागतो.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्या आता शासनदरबारी पोहोचणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिले पाठपुराव्याचे आश्वासन

Saturday, 28 November 2026, 14:32

निकृष्ट कामे करणाऱ्या अभियंत्यांची आता खैर नाही! पुणे महापालिकेचा नवा नियम; बिल काढण्याआधी गुणवत्ता तपासणी बंधनकारक

Saturday, 28 November 2026, 14:29

उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! हजारोंच्या संख्येने शेतकरी-मच्छीमार एकवटले

Saturday, 28 November 2026, 14:22

इंडिया आघाडीच्या बैठकीत सुप्रिया सुळे गैरहजर! मतदारसंघ पुनर्रचनेवर राष्ट्रवादीचा निर्णय गुलदस्त्यात

Saturday, 28 November 2026, 14:12

शिरूरमध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह तरुण अटकेत; पोलिसांची कारवाई

Saturday, 28 November 2026, 14:07

दगडूशेठ गणपती दर्शनाचे आमिष दाखवून महिलेला गंडा; 1.37 लाखांचा मुद्देमाल घेऊन तरुण पसार

Saturday, 28 November 2026, 12:46
Next Post
Pune Crime: Businessman kidnapped for Rs 50 lakh in Pimpri-Chinchwad! Police conduct 100 km film style chase and arrest accused from Sangamner

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये 50 लाखांसाठी व्यापाऱ्याचं अपहरण! पोलिसांचा 100 किमी फिल्मी स्टाईल पाठलाग अन् संगमनेरमधून आरोपी ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp