Gold Rate Today: भारतात आज, 28 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 1,27,740 रुपये इतका आहे, तर याच सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 12,774 रुपये नोंदवण्यात आला आहे. त्या तुलनेत, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 1,17,090 रुपये इतका असून, प्रति ग्रॅम दर 11,709 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,800 रुपये आणि प्रति ग्रॅम दर 9,580 रुपये इतका आहे.

आज मुंबई, पुणे, केरळ, कोलकाता, नागपूर, सुरत, नाशिक आणि बंगळुरु या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर समान आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. भारतात 28 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 173.10 रुपये इतका आहे. प्रति किलोग्रॅम चांदीचा भाव 1,73,100 रुपये नोंदवण्यात आला आहे. सुरत, नाशिक, मुंबई, दिल्ली आणि पुणे या सर्व शहरांमध्ये चांदीचे दर आज समान आहेत.
एकंदरीत, आज 28 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली आहे. गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा आणि चांदीचा स्थिर राहिला आहे.






