Gold Price Today: भारतात सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात ही घसरण सातत्याने सुरू आहे. लग्नसराईच्या निमित्ताने दागिने खरेदी करण्याची योजना आखणाऱ्या ग्राहकांना या दरघसरणीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज 25 नोव्हेंबर रोजी, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,120 रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे, 22 कॅरेट (दागिने) सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 1,14,690 रुपये असून, 18 कॅरेट सोन्याचा दर 93,840 रुपये नोंदवला गेला आहे. कालच्या दराच्या तुलनेत प्रति 10 ग्रॅममागे 710 रुपयांची लक्षणीय घट झाली आहे.
आज चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम 1,62,900 रुपये आहे. कालच्या तुलनेत चांदी 1,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.







