मुंबई: जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या (Gold Price) किमतीने सोमवारी 5,419 डॉलरचा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर, मंगळवारी (3 मार्च 2026) मात्र यात मोठी घसरण पाहायला मिळाली. युद्धाची भीती काहीशी ओसरल्याने आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेतील कडक संकेतांमुळे सोन्याचे दर प्रति औंस 5,074 डॉलरपर्यंत खाली आले आहेत. भारतीय रुपयाचा विचार करता, जागतिक बाजारातील ही घसरण स्थानिक स्तरावरही सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 2,000 ते 2,500 रुपयांची कपात करू शकते.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे सोन्याच्या किमतीत वाढ पाहायला मिळत होता.
अमेरिकेतील मॅन्युफॅक्चरिंग डेटा अपेक्षेपेक्षा जास्त आल्याने महागाई लवकर आटोक्यात येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे सोन्यावरील दबाव वाढला. 5,420 डॉलरच्या पातळीवर पोहोचताच मोठ्या प्रमाणात ‘ऑटोमेटेड सेल ऑर्डर्स’ ट्रिगर झाल्या, ज्यामुळे किमती वेगाने खाली आल्या.







