वृंदावन : मथुरेतील वृंदावन परिसरात संत प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूच्या घटनेने चर्चेला उधाण आले आहे. रसिक दुलारी शरण ऊर्फ दीपक लोधी याचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ते केली कुंज आश्रमातील गुरु कृपा कुंज या इमारतीत राहत असल्याची माहिती आहे. मागील आठवड्यात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली.

या प्रकरणात आता एक नवीन CCTV व्हिडीओ समोर आला आहे. सुमारे 33 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये मृत्यूच्या काही वेळ आधीची दृश्ये दिसत असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये रसिक काही वेळ शांत बसलेले दिसतात. त्यानंतर दुसरा एक शिष्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधीच रसिक यांनी इमारतीवरून उडी मारली.

Trigger warning:
CCTV footage of the final moments of Rasik Dulari Sharan, a disciple of Premanand Maharaj, has surfaced. The roughly 30-second clip shows him resting on a surface before jumping from the fourth floor of an ashram in Mathura, Uttar Pradesh.
Towards the end of the footage, another disciple could be seen casually walking in the frame.
SSP Shlok Kumar has said investigators are awaiting forensic analysis of the deceased’s mobile phone and the blood toxicology report before ruling out foul play. The inquiry is also examining why he inflicted a severe injury on his private parts before the fall.
— Piyush Rai (@Benarasiyaa) October 2, 2026

या घटनेनंतर रसिक दुलारी शरणच्या शरीरावर गंभीर जखम असल्याची माहितीही समोर आली होती. त्यांच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या जखमेचा त्याच्या मृत्यूशी काही संबंध होता का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, या बाबत अधिकृत तपासातूनच स्पष्ट माहिती समोर येणे अपेक्षित आहे.
CCTV मधील काही दृश्यांमुळेही विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कुंज आश्रमातील काही व्यवस्थात्मक बदलही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आश्रमातील दीक्षा देण्याचा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. तसेच टोकन पद्धतीने होणारे दर्शनही थांबवण्यात आले आहे. सेवादारांच्या वेशभूषेतही बदल केल्याची माहिती आहे. या सर्व बदलांमुळे आश्रमातील घटनेबाबत चर्चांना आणखी उधाण आले आहे.







