मेरठ: उत्तर प्रदेशात चर्चेत आलेल्या सौरभ हत्याकांड प्रकरणातील (Drum Queen News) आरोपी मुस्कान (Muskan Rastogi) ही गर्भवती होती. काही (Blue Drum Girl) दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडल्याने तिला मेरठ येथील LLRM मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. तुरुंगात असताना तिची तब्येत सतत खालावत होती. त्यामुळे तिला कडक पोलिस बंदोबस्तात स्त्रीरोग विभागात ठेवण्यात आले. सोमवारी मुस्कानने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे हा दिवस मृत सौरभचा वाढदिवस होता. त्यामुळे सोशल मीडियावर या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

मुस्कान ही सोशल मीडियावर ‘ब्लू ड्रम क्वीन’ म्हणून ओळखली जाते. तुरुंगात असताना तब्येत बिघडत असल्याची तक्रार तिने अनेक वेळा अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिची प्रसूती पूर्णपणे सुरक्षित झाली आहे आणि बाळ निरोगी आहे. प्रसूती कक्षातील डॉक्टरांनी सांगितले की तिची प्रसूती संध्याकाळी 6:50 वाजता सामान्य रित्या झाली. सध्या मुस्कान आणि तिच्या नवजात मुलीवर वैद्यकीय टीम लक्ष ठेवून आहे.
दरम्यान मृत सौरभच्या कुटुंबाने नवजात बाळाची DNA चाचणी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की सत्य काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे, कारण हे प्रकरण संवेदनशील आणि कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचे आहे. असे म्हटले जात आहे की मुस्कानला मुलगा होईल अशी अपेक्षा होती. तिने याबद्दल अनेक वेळा उल्लेखही केला होता, पण अखेर तिला मुलगी झाली.
मेडिकल कॉलेज परिसरात मुस्कानला दाखल केल्यापासून सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. वॉर्डबाहेर पोलिस तैनात आहेत आणि बाहेरील लोकांना भेटण्यास परवानगी नाही. पुढील कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सौरभ हत्येचा खटला अजूनही सुरु आहे आणि मुस्कान न्यायालयीन कोठडीतच आहे. मात्र मुलीचा जन्म झाल्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. आता सर्वांचे लक्ष DNA अहवाल काय सांगतो यावर आहे.







