Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीत घडलेल्या घटनेचे पुलवामा कनेक्शन उघड; तपासातून धक्कादायक माहिती आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 11 November 2025, 8:34

दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट झाल्याने खळबळ माजली आहे. मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा शक्तिशाली स्फोट झाला. या दुर्घटनेत 8 लोकांचा बळी गेला, तर गंभीर जखमी झालेल्यांची संख्या सुमारे 24 आहे. स्फोटाचा तपास सुरू असला तरी, जखमींची भीषण अवस्था पाहता, बळींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. दिल्लीतील या घटनेकडे दहशतवादी हल्ला म्हणून पाहिले जात आहे. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

 

स्फोटाचे ‘पुलवामा कनेक्शन’

या स्फोटात वापरण्यात आलेल्या कारची माहिती तपास यंत्रणांनी काढली असता, धक्कादायक पुलवामा कनेक्शन समोर आले आहे. ही कार (I20) ज्या शेवटच्या व्यक्तीला विकण्यात आली होती, तो तारिक हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामाचा रहिवासी आहे.

कार बेकायदेशीरपणे विकली

स्फोटात वापरण्यात आलेल्या I20 कारची खरेदी-विक्री साखळी तपास यंत्रणांना संशयास्पद वाटत आहे. ही कार 2014 पासून आतापर्यंत 4 मालकांकडून विकत घेतली गेली आहे. सर्वात आधी सलमान नावाच्या व्यक्तीने 18 मार्च 2014 रोजी ही कार खरेदी केली. त्यानंतर, ही कार देवेंद्र, सोनू आणि शेवटी तारिक यांच्यापर्यंत पोहोचली. धक्कादायक बाब म्हणजे, एकदाही या कारची मालकी अधिकृत कागदपत्रांमध्ये बदलली गेली नव्हती; हा संपूर्ण व्यवहार बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजमधून मार्ग स्पष्ट:

तपास यंत्रणांनी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले आहे. महत्त्वाच्या मार्गांवरून फिरत ही कार शेवटी लाल किल्ल्याच्या परिसरात पोहोचली. दरम्यान, या प्रकरणी राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी अमीर आणि उमर या दोन भावांना पुलवामा येथून ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यांना ताब्यात घेऊन श्रीनगरला आणण्यात आले असून अधिक चौकशी केली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07
Next Post

धाकधूक वाढली! आज आरक्षण सोडत होणार जाहीर; अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.