Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पलंगावर सडलेला मृतदेह, वरच्या दिशेला हात अन् घरात रक्ताचे डाग; पंजाबी गायकाच्या मृत्यूने खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 5 September 2026, 10:43

पंजाब: मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक बलजीत सिंह हे त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले. ते 35 वर्षांचे होते. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होत नव्हता. अखेर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

ही घटना 3 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर बलजीत सिंह यांचा मृतदेह पलंगावर आढळला. मृतदेह सडला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू काही दिवसांपूर्वीच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, गायकाचा मृतदेह पलंगाला टेकलेल्या अवस्थेत होता, तर त्याचे हात वरच्या बाजूला असल्याचे दिसून आले. या परिस्थितीमुळे सुरुवातीला पोलिसांना घटनेबाबत संशय निर्माण झाला आणि त्यांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला.

मात्र, घरातील काही खोल्यांमध्ये रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांचा संशय वाढला. सुरुवातीला या घटनेमागे घातपाताची शक्यता आहे का, याचा तपास करण्यात आला. त्यासाठी फॉरेन्सिक टीम, श्वानपथक आणि CIA पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची तपासणी करून विविध पुरावे गोळा केले.

 

बलजीत यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्या घरी कोण आले होते, तसेच ते मागील काही दिवसांत कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांकडूनही माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालातून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, बलजीत सिंह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोस्टमार्टममध्ये समोर आले आहे. त्यामुळे हत्या किंवा घातपाताच्या शक्यतेबाबतचा सुरुवातीचा संशय काहीसा कमी झाला आहे. मात्र, घरात आढळलेल्या रक्ताच्या डागांसह इतर बाबींची चौकशी अद्याप सुरू आहे.

बलजीत सिंह सुधर येथील धालीवाल परिसरात एकटे राहत होते. त्यांच्या मृतदेहावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडच्या काळात ते व्यसनाच्या आहारी गेल्याची चर्चा होती. त्यांच्या काही गाण्यांवर गँगस्टर संस्कृतीचे उदात्तीकरण केल्याचे आरोपही झाले होते. मात्र, या बाबींचा त्यांच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50
Next Post

DJ लावा पण पुणे पोलिसांची ‘डेसिबलवर’ नजर; नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; आयुक्त अमितेश कुमारांचा मंडळांना सज्जड दम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp