पाटणा: बिहारमधील कटिहार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना (Crime News) उघडकीस आली आहे. “तू काळी आहेस, मग तुझा मुलगा गोरा कसा झाला?” या सततच्या (Viral News) चेष्टेमुळे आणि मित्र-शेजाऱ्यांच्या टोमण्यांमुळे एका व्यक्तीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिची निर्घृण हत्या केली. हा प्रकार आबादपूर पोलिस स्टेशन हद्दीतील नारायणपूर गावात घडला असून परिसरात मोठी दहशत पसरली आहे. आरोपी पती सध्या फरार आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (Breaking News)

मिळालेल्या माहितीनुसार, आझमनगर पोलिस स्टेशन परिसरातील जलकी गावातील सुकुमार दास आणि त्यांची पत्नी मौसमी दास यांना तीन महिन्यांपूर्वी दुसरा मुलगा झाला. आधीचा मुलगा सावळा होता, तसेच सुकुमारही गोरा नव्हता. मात्र दुसरा मुलगा गोरा जन्माला आल्यानंतर सुकुमारला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. मित्र आणि शेजाऱ्यांनी “तू काळा आहेस, मग तुझा मुलगा गोरा कसा?” असे टोमणे मारत त्याच्या संशयाला खतपाणी घातलं.
यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत राहिले. मौसमीने वारंवार सांगूनही सुकुमारला मुलाबद्दलचा विश्वास बसत नव्हता. अखेर त्रासाला कंटाळून मौसमी बाळाला घेऊन तिच्या माहेरी नारायणपूर येथे आली. तीन महिन्यांपासून दोघांमध्ये याच मुद्द्यावरून वाद सुरू होता. बुधवारी सुकुमार सासरच्या घरी आला. कुटुंबीयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. रात्री सर्वजण जेवल्यानंतर झोपायला गेले. मात्र रात्रीच सुकुमारने मौसमीचा गळा चिरून तिची हत्या केली. तसेच गुप्तांगात वार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीतून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर कुटुंबीयांनी दरवाजा उघडला तेव्हा मौसमी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत दिसली. आरोपी पती पळून गेला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सुकुमार दासविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.







