देहरादून: अनेक बांगलादेशी नागरिक (Crime News) अवैधरित्या भारतात प्रवेश करतात, काहीजण बनावट आधारकार्ड, पॅनकार्डसह येत असल्याने त्यांना शोधणेही कठीण होते. भारतीय जवान आणि पोलीस प्रशासन अशा घुसखोरांवर नियमित कारवाई करतात आणि त्यांना परत त्यांच्या देशात पाठवतात, पण तरीही घुसखोरीचे प्रमाण कमी होत नाही. (Breaking News)

देहरादून पोलिसांनी अशाच प्रकारे एका बांगलादेशी महिलेले शोधून काढलं आहे. ही महिला आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड आढळले. या महिलेनं भारतात येऊन नाव देखील बदलले होते. तिने भूमी शर्मा हे खोटे नाव घेतले आणि देहरादून येथील एका हिंदू तरुणासोबत लग्न करून आपली खरी ओळख लपवली. पोलिस तपासात तिचे मूळ नाव बबली खातून असल्याचे उघड झाले.
अटक झालेल्या महिलेसाठी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच बनावट कागदपत्रे बनवण्यास मदत करणाऱ्यांचा शोधही सुरु आहे. या तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. याआधी ऑपरेशन कालनेमी अंतर्गत 17 बांगलादेशींवर पोलिसांनी कारवाई केली होती.







