Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नको तो व्हिडीओ पाहून भावानेच बनवलं सख्या बहिणीला आपल्या वासनेची शिकार; त्यानंतर आईसमोरच घोटला गळा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 28 July 2024, 16:09

Madhya Pradesh Crime : मध्य प्रदेशमध्ये देशाला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. जो भाऊ आपल्या बहिणीच संरक्षण कार्याला सर्वात पुढे असतो त्यांचं आपल्या 9 वर्षांच्या बहिणीला त्याने वासानेच शिकार बनवल्याचं समोर आलं आहे. तसेच हा नराधम भाऊ एवढ्यावरच थांबला नाही, तर झालेला प्रकरा कुणाला कळू नये म्हणून त्याने स्वतःच्या सख्या बहिणीचा गळा आवळून तिचा जीव घेतला आहे. या घटनेने देशात एकच खळबळ उडाली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपी भाऊ अल्पवयीन असून त्याचा गुन्हा लपवण्यासाठी आईनं पुरावेदेखील नष्ट केल्याचं समोर आलं आहे.

मध्य प्रदेशातील घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. एका अल्पवयीन मुलानं आधी स्वतःच्या 9 वर्षांच्या बहिणीवर बलात्कार केला आणि त्यानंतर त्यानं तिची गळा आवळून हत्या केली. या घटनेपूर्वी आरोपीनं मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाहिल्याचंही समोर आलं आहे. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि आरोपीच्या बचावासाठी आई आणि इतर बहिणीनं अनेक पुरावे नष्ट केल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भीषण घटना 24 एप्रिल रोजी घडली आहे. तब्बल 3 महिन्यांच्या कसून चौकशीनंतर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणात 50 जणांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच, आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे. तसेच, तांत्रिक पुराव्याच्या आधारे या प्रकरणात आणखी काही गोष्टींची उकल होऊ शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पीडितेचा 13 वर्षांचा भाऊ, तिची आई आणि दोन 17-18 वर्षांच्या बहिणींना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

घराच्या अंगणातच मुलीचा मृतदेह..

पोलीस अधीक्षक विवेक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी जिल्ह्यातील जावा पोलीस स्टेशन परिसरात 9 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला, त्यानंतर तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी मृत तरुणीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडितेचा मृतदेह तिच्या घराच्या अंगणातून सापडला, जिथे ती घटनेच्या वेळी झोपली होती. कुटुंबीयांची कसून चौकशी केल्यानंतर पीडितेचा 13 वर्षीय भाऊ रात्री तिच्या शेजारीच झोपला असल्याचं उघड झालं आहे.

 

अश्लिल व्हिडीओ पाहून त्यानं..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलानं मोबाईल फोनवर अश्लिल व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या बहिणीवर बलात्कार केला. ज्यावेळी पीडितेनं आपल्या वडिलांना ही घटना सांगणार असल्याचं आरोपीला सांगितलं, तेव्हा त्याने घाबरून बहिणीचा गळा आवळून तिचा जीव घेतला. त्यानंतर आपल्या आईला उठवून सर्व घटना सांगितली. तेव्हाही पीडित मुलगी जीवंत होती. पण, बहिण अजूनही जिवंत आहे, हे समजल्यावर आरोपी भावानं पुन्हा तिचा गळा घोटला आणि तिचा जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व आईच्या डोळ्यांसमोर घडत होतं.

पुरावे केले नष्ट..

आरोपीची आई आणि दोन बहिणींना संपूर्ण प्रकार समजला. त्यावेळी लोकांना आणि पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी सर्वात आधी अंथरुणं बदलली. त्यानंतर ज्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, विषारी किडा चावल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या झाली असल्याचं समोर आलं. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एक एसआयटी गठीत करण्यात आली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भूल देण्याचं औषध सलाईनमध्ये भरलं, बाथरूममध्ये गेला तो परतलाच नाही; मित्राची शोधाशोध अन् पोलिसांनी दार तोडताच समोरचं दृश्य पाहून…

Sunday, 11 October 2026, 18:14

शिरूरमध्ये दुष्काळाचे सावट असताना केवळ एक टक्के क्षेत्रावरच पंचनामे; प्रशासन मात्र ‘कागदी घोडे’ नाचवण्यात व्यस्त!

Sunday, 11 October 2026, 17:53

आमदार कटके यांच्या जनता दरबारात पूर्व हवेलीतील समस्यांचा पाढा! वीजपुरवठा, भूसंपादनाच्या प्रश्नांवर आमदार माऊली कटके आक्रमक

Sunday, 11 October 2026, 17:46

महाराष्ट्रात पुरंदरच्या ‘आडाचीवाडी’ ग्रामपंचायतीने मारली बाजी; पटकावला राज्यातील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा मान; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऐतिहासिक गौरव

Sunday, 11 October 2026, 16:57

थेऊरचा कचरा प्रकल्प दुसरीकडे हलवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार – आमदार माऊली कटके

Sunday, 11 October 2026, 16:53

“काय समजतेस तू स्वतःला? एवढी मोठी झाली का?” नानांनी मला खूप झापलं होतं’ बड्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा; म्हणाली “आमच्यात सतत वाद..

Sunday, 11 October 2026, 16:14
Next Post

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं उघडलं खातं; नेमबाज मनू भाकरने इतिहास रचत पटकावलं कांस्य पदक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp