मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. बुधवारी, 25 नोव्हेंबर 2026 रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा थोडी वाढ नोंदवण्यात आली. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम वाढले आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणारे आणि गुंतवणूकदार बाजारातील बदलांकडे लक्ष देत आहेत.

आजचे सोन्याचे दर किती?
नवीन दरांनुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 12,781 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 11,716 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचला आहे. मागील काही सत्रांमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी दरांमध्ये सुधारणा झाली आणि बुधवारीही ही वाढ कायम राहिली.
प्रमुख शहरांतील सोने-चांदीचे दर
25 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे दर आणि 1 किलो चांदीचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

- दिल्ली: 22 कॅरेट – 1,17,310 रुपये, 24 कॅरेट – 1,27,910 रुपये, चांदी – 1,27,810 रुपये.
- मुंबई: 22 कॅरेट – 1,17,160 रुपये, 24 कॅरेट – 1,27,810 रुपये, चांदी – 1,27,810 रुपये.
- कोलकाता: 22 कॅरेट – 1,17,160 रुपये, 24 कॅरेट – 1,27,810 रुपये, चांदी – 1,27,810 रुपये.
- चेन्नई: 22 कॅरेट – 1,17,160 रुपये, 24 कॅरेट – 1,27,810 रुपये, चांदी – 1,27,810 रुपये.
- बंगळूरु आणि हैदराबाद: 22 कॅरेट – 1,17,160 रुपये, 24 कॅरेट – 1,27,810 रुपये, चांदी – 1,27,810 रुपये.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची किंमत, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, आयात शुल्क आणि देशांतर्गत मागणी यावर सोने-चांदीचे दर ठरतात. 22 कॅरेट सोने प्रामुख्याने दागिने बनवण्यासाठी वापरले जाते, तर 24 कॅरेट सोने नाणी आणि बिस्किटांच्या स्वरूपात गुंतवणुकीसाठी घेतले जाते.






