Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पदवीधर शिक्षकांच्या पगारात होणार मोठी वाढ? S-14 वेतनश्रेणी लागू झाल्यास हातात मिळू शकतात 60 हजार रुपये

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 25 November 2026, 8:58

मुंबई : पदवीधर विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) न्यायालयाने फेटाळल्याने संबंधित शिक्षकांना S-14 वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. अनेक वर्षांपासून या मागणीसाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या शिक्षकांना या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

या प्रकरणाची सुरुवात नागपूर खंडपीठातील न्यायालयीन लढ्यातून झाली होती. पदवीधर विशेष शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा मुद्दा उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला होता. या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सरकारची याचिका फेटाळल्याने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहिला आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार S-14 वेतनश्रेणीची मूळ वेतनमर्यादा 38,600 ते 1,22,800 रुपये आहे. उपलब्ध अंदाजानुसार, सुरुवातीच्या टप्प्यातील शिक्षकांना 60 टक्के महागाई भत्ता गृहीत धरल्यास एकूण ढोबळ वेतन सुमारे 75,616 रुपये होऊ शकते. विविध कपातींनंतर हातात अंदाजे 60,354 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

तर 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी मूळ वेतन 59,100 रुपये गृहीत धरले आहे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहन भत्ता धरून त्यांचे ढोबळ वेतन सुमारे 1,06,316 रुपये होऊ शकते. कपातीनंतर निव्वळ पगार अंदाजे 85,106 रुपये राहू शकतो.

S-14 वेतनश्रेणी लागू झाल्यास शिक्षकांच्या मासिक पगारात वाढ होण्याबरोबरच मागील कालावधीतील वेतनातील फरक म्हणजेच थकबाकी मिळण्याचाही प्रश्न मार्गी लागू शकतो. विशेषतः इयत्ता 6 वी ते 8 वीच्या पदवीधर विषय शिक्षकांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकार काय कार्यवाही करते, याकडे आता शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पदवीधर शिक्षकांच्या पगारात होणार मोठी वाढ? S-14 वेतनश्रेणी लागू झाल्यास हातात मिळू शकतात 60 हजार रुपये

Wednesday, 25 November 2026, 8:58

शाळांमध्ये डोनेशन देऊन प्रवेश घेण्याचे दिवस संपणार! नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी आता लॉटरी; वशिलेबाजी केल्यास शाळेची मान्यता रद्द?

Wednesday, 25 November 2026, 8:31

शोरमा खाल्ला अन् उलट्या-जुलाब सुरू! 34 जणांना विषबाधा; दुकानावर पोलिसांची कारवाई

Wednesday, 25 November 2026, 8:23

पुण्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळ! हृदयविकार अन् मधुमेहाच्या नावाखाली बनावट औषधांचा पुरवठा; कंपनीचा परवाना रद्द

Wednesday, 25 November 2026, 8:13

Maharashtra Weather: महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला; तुमच्या भागात कसे असेल हवामान? वाचा

Wednesday, 25 November 2026, 7:59

Daily Horoscope: सूर्य, चंद्र, मंगळ आणि गुरूमुळे तयार होतोय शुभ योग! आज या राशींचे नशीब पालटणार?

Wednesday, 25 November 2026, 7:47
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp