Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 31 August 2026, 18:04

मुंबई : उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच सरकारमध्ये अंतर्गत नाराजीची चर्चा रंगली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सरकार आणि मंत्र्यांवरील आक्रमक वक्तव्ये, तसेच रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली एक वर्षाची मुदतवाढ, या दोन मुद्द्यांवरून काही मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील सरकारच्या भूमिकेवर टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारमधील काही मंत्र्यांवरही त्यांनी आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना काही मंत्र्यांमध्ये असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा थेट आणि प्रभावी समन्वय राहावा, तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संवादाची प्रक्रिया अधिक स्पष्टपणे पुढे न्यावी, असा सूर काही मंत्र्यांकडून व्यक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मुद्दा उद्याच्या बैठकीत चर्चेत येतो का, याकडे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरून शिवसेनेच्या काही मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे.

 

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी बदल केल्याने मराठी माणूस आणि भूमिपुत्रांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भावना काही मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे सरकारमधीलच काही घटक नाराज असल्याची चर्चा आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा समन्वय आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी मुदतवाढीचा निर्णय, या दोन मुद्द्यांवर उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही विषयांवर मंत्री आपली नाराजी व्यक्त करणार का आणि त्यावर सरकारकडून काय भूमिका घेतली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

Monday, 31 August 2026, 18:37

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35

गणेशोत्सवात डीजेवर बंदी? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत; पुण्यातून ध्वनिप्रदूषणाविरोधात कडक आवाहन

Monday, 31 August 2026, 17:06

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56
Next Post

पुण्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची धाड! नेत्यांसाठी आलेल्या जेवणाची अचानक तपासणी झाल्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp