Sharad Pawar (BMC Election) : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील वाद पुन्हा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने मुंबईत मोठा मेळावा आयोजित केला, जिथे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी “एकला चलो” असा संदेश दिला आणि काँग्रेस मुंबईत स्वबळावरच निवडणूक लढवणार असल्याची जाहीर केली. यासोबतच, मनसेला सोबत घेण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला. ही घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडी फुटणार आहे का, अशी चर्चाही रंगल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबई महापालिकेत मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना तातडीने फोन करून मुंबई महापालिका निवडणूक कशी लढवायची यावर सोमवारी किंवा मंगळवारी बैठक बोलावली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी पवारांची भेट घेतली होती आणि राष्ट्रवादी सोबत लढण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. मात्र पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की नव्याने काही वेगळा प्रयोग करणार, यावर स्पष्टता नव्हती. sharad pawar
यावेळी पवार मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यांच्या भूमिकेनुसार, “मनसेसोबत राज्यात सत्याचा मोर्चा काढला, मग निवडणूक स्वबळावर का लढायची?” असा प्रश्न उपस्थित होतो. मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला आहे. काँग्रेस हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मित्रपक्ष असूनही पवारांनी मनसेकडे कल दाखवल्याची चर्चा आहे.
”जो पक्ष सोबत येतो, त्यालाही सामावून घ्या”
शरद पवारांनी काँग्रेसने सांगितल्याप्रमाणे स्वबळावर लढण्याऐवजी महाविकास आघाडीने मुंबई निवडणूक एकत्र लढवली पाहिजे, आणि जो पक्ष सोबत येतो, त्यालाही सामावून घ्यावे, असा असा संदेश काँग्रेसला दिल्याचं समजतं.
यामुळे पवारांनी काँग्रेसच्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेला अप्रत्यक्ष विरोध केला असल्याची चर्चा आहे. फक्त काँग्रेस–राष्ट्रवादी युती करण्याचा प्रस्ताव बाजूला सारल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळे काँग्रेसने आपली भूमिका कायम ठेवली, तर मुंबई महापालिकेत पवार मनसे आणि ठाकरे गटाला सोबत घेऊन वेगळा राजकीय प्रयोग करण्याची शक्यता व्यक्त झाली आहे.







