मुंबई : लालपरीच्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. विधानसभा निवडणुकींपासून चर्चेत असणाऱ्या एसटी महामंडळाच्या दरवाढीला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार असून एसटीच्या तिकिट दरांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

नवे तिकिट दर कधीपासून लागू होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण लवकरच एसटी महामंडळाकडून नवीन तिकट दर लागू करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ कऱण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. गुरुवारी झालेल्या मंत्रालयातील राज्य परिवहन प्राधिकराणाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन दरवाढ झाल्यानंतर एसटीचा प्रवास सरासरी ७० ते ८० रूपयांनी महागणार आहे. १०० रूपयांचे तिकीट आता ११५ रूपयांना मिळणार आहे.








