Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 महायुतीत पुन्हा धुसफूस, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून अजित पवारांविरुद्ध तक्रारींचा पाढा; मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची केली विनंती

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 4 June 2025, 17:52

मुंबई : प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुतीत दिवसागणिक अधिकाधिक खटके उडू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर कुरघोड्याचे प्रयत्न सुरु आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन  दोन्ही पक्षांत वाद सुरु असताना आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लक्ष्य होत असताना शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

दर महिन्याच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या खात्याच्या कामाचा आढावा घेतात. त्याप्रमाणे मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली. शिवसेना मंत्र्यांना अर्थखात्याकडून मिळत असलेल्या सावत्र वागणुकीबद्दल सर्वच मंत्र्यांनी संताप व्यक्त केला. निधी वाटपात शिवसेनेच्या खात्यांवर अन्याय होत आहे. तरतूद असलेल्या कामांमध्येही खोडा घातला जात आहे, अशी तक्रार मंत्र्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करायला सांगा, अशी मागणीही मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे समजते. यावेळी अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दल सेनेच्या सर्वच मंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

विकासकामे करायची कशी?

तीन पक्षांचे सरकार असल्याने सगळ्यांना समान संधी मिळणे गरजेचे आहे. विकासनिधीचे समान वाटप होणे आवश्यक आहे. पण अर्थमंत्री अजित पवार आमच्या खात्यांना पुरेसा निधी देत नाहीत, मग विकासकामे करायची कशी, असा सवाल मंत्र्यांनी शिंदेंना विचारला. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसून आली.

जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर मी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलतो, लवकरच या प्रकरणात मार्ग निघेल, असा शब्द शिंदे यांनी मंत्र्यांना दिला. त्यामुळे आता या प्रकरणात शिंदे कसा मार्ग काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 
Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saturday, 24 October 2026, 11:56

दसऱ्यासाठी गाव गाठलं, इकडे घर फोडलं! कुंजीरवाडीत चोरट्यांचा डाव अन् 23 हजारांचा ऐवज केला लंपास

Saturday, 24 October 2026, 11:43

Loni Kalbhor News: प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बोलावले अन् पोलीस ठाण्याबाहेरच गोंधळ; माजी सैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 11:36

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पाण्याचं गणित बिघडलं, प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Saturday, 24 October 2026, 11:21

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ‘मुळशी कनेक्शन’, दोन व्हिडिओंनी वाढवलं गूढ

Saturday, 24 October 2026, 11:10

Loni Kalbhor News: कॉलेजच्या गरबा कार्यक्रमानंतर राडा! विद्यार्थ्याला बेल्ट अन् दांडक्याने मारहाण; नेमकं कारण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 10:54
Next Post

भरधाव टेम्पोने चिमुरड्यांसमोरच घेतला आईचा जीव; पुणे महामार्गावर भीषण अपघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp