मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशातच आता मुंबई पोलीस दलातील एका हवालदारच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हर्ष म्हस्के असे या मुलाचे नाव असून तो 20 वर्षांचा होता. हर्षने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आपले जीवन संपवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परेल परिसरातील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलीस हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केली आहे. हर्ष म्हस्के असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या.
हर्षचे वडील पोलीस हवालदार संतोष म्हस्के हे एसपी युनिटमध्ये मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. संतोष म्हस्के यांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून हर्षने स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून आयुष्याचा शेवट केला. संतोष म्हस्के हे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही काळ बंदोबस्तासाठी त्यांच्या युनिटमध्ये तैनात होते, अशी माहिती मिळत आहे. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हे त्यांच्या घरी पोहोचले असून ते या घटनेची माहिती घेत आहेत. परंतु, २० वर्षीय हर्ष म्हस्केने आत्महत्या का केल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.








