Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुरुंगात जाईल पण माफी मागणार नाही; प्रिय लोकशाही असं म्हणत…सुषमा अंधारे याचं थेट नीलम गोऱ्हेंना पत्र

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 23 December 2023, 12:25

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांच्यावर अलीकडेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. रविंद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडीओ सुषमा अंधारेंनी प्रसिद्ध केला होता. या मुद्द्यावरुन भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव मांडला होता. (Neelam Gorhe)

या संदर्भात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशांबाबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्र लिहिलं आहे. मी माफी अजिबात मागणार नाही. यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी माझी तयारी आहे, अशी स्पष्ट भूमिका सुषमा अंधारे यांनी पत्रात मांडली आहे.(Sushma Andhare)

काय आहे नेमकं सुषमा अंधारेंच्या पत्रात?

प्रिय लोकशाही

तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे. स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळात ही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे याचे मला भान आहे.

 

व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संविधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील ‘व्यक्तीने’ माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे.

माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले, किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला अगदी तितक्याच अनाहूत, नकळतपणे माझ्याकडून श्रीमती गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे. पण हा दंडनीय अपराध नव्हे. पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे.

सभागृहाची सभापती पदाची गौरव गरिमा वगैरे शब्द उच्चारले जात आहेत पण जर खरेच अशी गरिमा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना किंवा सभापती पदावरील व्यक्तीला कळत असेल तर मग या सभापती पदाचे किंवा या सभागृहाचे अस्तित्व ज्या संविधानामुळे आहे. त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबार मध्ये मंत्री असणारे श्री चंद्रकांत जी पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही. किंवा महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून आ .प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगुंटीवार यांनी ठामपणे तात्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोशारी यांच्या संदर्भाने निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही.

सभापती पदावरील व्यक्तीने आठ दिवसाच्या आत ताबडतोब माफी मागा अशी भूमिका श्री चंद्रकांत पाटील किंवा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्याबाबत का घेतली नाही?

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Yavat Theft News : बोरीपार्धी येथे सोसायटीत घरफोडी; १ लाख ४० हजारांचे दागिने चोरीला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp