Mumbai Police: मुंबई: मुंबई पोलिसांचे धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे नाल्यात पडलेल्या व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत मुंबई पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. (Mumbai Police)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईच्या जोगेश्वरी भागातील आहे. एक व्यक्ती नाल्यात चुकून पडल्याची माहिती जोगेश्वरी पोलीस ठाण्यातील मोबाईल १ व्हॅनल मिळाली. तात्काळ पोलीस ठाण्यातील हवालदार घटनास्थळी दाखल झाले. एक पोलीस कर्मचारी दोरीच्या साहाय्याने नाल्यात उतरले. सहकाऱ्यांनी वरून दोरी पकडून सदर व्यक्तीला नाल्यातून सुरक्षितपणे बाहेर काढले. पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि काळजीपूर्वक त्यांची चौकशी केली.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परता आणि धाडसाचे मनापासून कौतुक केले आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले, “जीव वाचवणाऱ्या आमच्या हिरोंना सलाम.” तर दुसऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, “मुंबई पोलिसांच्या सततच्या मदतीबद्दल आणि संरक्षणाबद्दल मनःपूर्वक आभार.”.
पहा व्हिडिओ
सदर व्यक्तीला तात्काळ रुग्णालायता दाखल करण्यात आले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी चांगल्या प्रतिसाद दिला आहे.






