Uruli Kanchan : दिल्ली अलीपूर येथे झालेल्या नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उरुळी कांचन व पंचक्रोशी भागातील निर्माण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत यश मिळवत अभिमान उंचावला आहे. अकॅडमीतील एकूण 17 विद्यार्थी स्पर्धेसाठी क्वालिफाय झाले होते आणि विशेष म्हणजे सर्वच 17 विद्यार्थी पदकविजेते ठरले. विविध जिल्ह्यांतील टीम सहभागी असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण दुसरा क्रमांक पटकावत शानदार कामगिरी केली असून, त्यात निर्माण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे.

या भव्य यशानंतर उरुळी कांचनमध्ये महाराष्ट्र टीममधील सर्व विद्यार्थ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. प्रशिक्षक व निर्माण अकॅडमीचे संचालक संदीप कांचन, प्रशिक्षक शकील शेख व फरदीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कठोर सराव करून हे यश मिळवले. (Uruli Kanchan)
दरम्यान, भरतगाव येथील स्पर्धक लोकेश उर्फ माऊली नानासाहेब जगदाळे यानेही सिल्वर मेडल जिंकत भरतगावचा मान उंचावला. गावकऱ्यांनी त्याचे जोरदार कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव केला.
पदक विजेत्यांची नावे व मिळालेली पदके
गोल्ड पदक विजेते
शिवराज निकम, समर्थ कांचन, हरमन सिंग
सिल्वर पदक विजेते
विवेक पांडे, श्लोक कुंजीर, आयुष प्रसाद, फैजान शेख, आदित्य चव्हाण, लोकेश जगदाळे, श्रीवर्धन कदम, रितेश चव्हाण, श्रीतेज कांचन, आर्या भाटे
ब्राँझ पदक विजेते
सार्थक मचाले, समर्थ मचाले, सोहम शिंदे, यशराज बडेकर







