Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मास्टर प्लॅन; महाराष्ट्र देशात अव्वल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 11 February 2026, 11:57

Maharashtra Farmer Suicide:  मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत स्वतंत्र शेतकरी आत्महत्या प्रतिबंध टास्क फोर्स (Farmer Suicide Prevention Task Force) स्थापन केला आहे. कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे याची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या समस्या केवळ आर्थिक नाहीत, तर मानसिक, सामाजिक आणि हवामान बदलाशी संबंधितही आहेत. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून उपाययोजना करण्याचा या कृती दलाचा उद्देश आहे. अशा प्रकारची स्वतंत्र यंत्रणा उभारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

या टास्क फोर्सचे नेतृत्व विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी करणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन सुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यनित शितोळे आणि सोनाली शिळकर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विविध विभागांमध्ये समन्वय साधून काम करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे.

या कृती दलात मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचाही सहभाग आहे. शिवार फाऊंडेशनमार्फत संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा तसेच महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमाला मानवी दृष्टिकोनासोबत तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे.

राज्यात विविध शेतकरी कल्याणकारी योजना राबवल्या जात असल्या तरी हवामान बदल, पिकांचे नुकसान, वाढता खर्च, कर्जाचा ताण आणि बाजारातील चढउतार यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर आपत्तीपूर्व, आपत्तीच्या काळात आणि त्यानंतरही शेतकऱ्यांना मदत देण्याचा आराखडा तयार केला जाणार आहे.

कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले की, शेतकरी आत्महत्येचा प्रश्न केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही. शेतकऱ्यांना आधीच सक्षम करणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे आणि मानसिक आधार देणे यावर भर दिला जाणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह राज्यातील ग्रामपंचायत ‘प्रशासक राज’ला उच्च न्यायालयाचा ब्रेक; शासन आदेशाला तूर्त स्थगिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp