Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाप रे एवढी महागाई! जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या; कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ, आणखी काय-काय महागलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 13 October 2026, 16:41

मुंबई : सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर महागाईचा ताण वाढत असून, वर्षभरात सरकारकडून देखरेख केल्या जाणाऱ्या ४२ जीवनावश्यक वस्तूंपैकी ४१ वस्तूंच्या किमती वाढल्याचे समोर आले आहे. कांद्याच्या दरात तब्बल ११३ टक्क्यांची वाढ झाली असून, साखर आणि खाद्यतेलही महागले आहे. महाराष्ट्रातील खरीप कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने कांद्याचे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ बटाट्याच्या किमतीत वर्षभरात घट नोंदवण्यात आली आहे.

सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर ५.५ टक्क्यांवर पोहोचला. अन्नपदार्थांच्या वाढत्या किमती हे त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात वार्षिक अन्नधान्य महागाईचा दर ७.७४ टक्के नोंदवण्यात आला. त्यामुळे तांदूळ, डाळी, साखर, तेल यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या वाढत्या किमतींचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होत आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, वर्षभरात साखरेच्या किमतीत सुमारे २२ टक्के, तर सूर्यफूल तेलाच्या किमतीत जवळपास १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचा सरासरी किरकोळ दर प्रतिलिटर १९१ रुपयांवर पोहोचला आहे. पाम तेलाच्या किमतीत १५.२ टक्के, तर सोया तेलाच्या किमतीत १४.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोहरीच्या तेलाचा दरही प्रतिलिटर १८८ रुपयांवरून २०४ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

डाळींच्या किमतीतही वाढ दिसून येत आहे. तूरडाळीचा सरासरी दर प्रतिकिलो ११३ रुपयांवरून १२९ रुपयांवर गेला आहे. प्रमुख महानगरांमध्ये तूरडाळीचे दर प्रतिकिलो १४० ते १४५ रुपयांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. चणाडाळीची सरासरी किंमतही ८५ रुपयांवरून ९१ रुपये प्रतिकिलो झाली आहे.

 

सामान्य तांदळाच्या दरात सुमारे १२ टक्क्यांनी वाढ होऊन तो प्रतिकिलो ४७ रुपयांवर पोहोचला आहे. गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमतीत तुलनेने कमी वाढ झाली आहे. साखरेचा दर एका महिन्यात ५९ रुपयांवरून ५६ रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आला असला, तरी तो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २२ टक्क्यांनी जास्त आहे. दर नियंत्रणासाठी सरकार राखीव साठ्यातील हरभरा बाजारात आणण्याचा विचार करत असल्याची माहितीही समोर आली आहे.

भाजीपाल्याच्या दरांमध्ये कांद्याची वाढ सर्वाधिक आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो सुमारे ५३ रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, बटाट्याच्या किमतीत सहा टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. टोमॅटोचा दरही मागील वर्षीच्या ३६ रुपयांवरून ४२ रुपये प्रतिकिलो झाला आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात खरीप कांद्याच्या उत्पादनात अंदाजे पाच ते सात टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. लागवडीखालील क्षेत्रात झालेली घट आणि मान्सूनच्या पावसाला झालेला विलंब ही त्यामागील कारणे सांगितली जात आहेत. खरीप हंगामातील कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर दर कमी होण्याची सरकारला अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत कांद्याच्या वाढत्या किमतींचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बाप रे एवढी महागाई! जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या; कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ, आणखी काय-काय महागलं?

Tuesday, 13 October 2026, 16:41

‘मी यानंतर कॉपी करणार नाही, चूक झाली’ साहिलने दिलं होतं लेखी निवेदन; आत्महत्येपूर्वी मत्रिणीशी साधला होता संवाद, प्रकरणात नवा खुलासा

Tuesday, 13 October 2026, 16:34

थेऊर येथे महावितरणचा ‘हाय व्होल्टेज’ झटका! 3 घरांतील टीव्ही, फ्रीज, महागड्या लाईट जळाल्या, आठ दिवसांत दुसरी घटना

Tuesday, 13 October 2026, 16:25

एकनाथ शिंदेंनी शब्द देताच पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! मीनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढल्या; पतीची पोलिसांकडून चौकशी सुरु…

Tuesday, 13 October 2026, 16:07

“५ लाख दे नाहीतर कारवाई करेन” फुरसुंगीत गुटखा विक्रेत्याला मागितली५ लाखांची खंडणी; पोलीस अमंलदाराचं तडकाफडकी निलंबन

Tuesday, 13 October 2026, 15:35

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मिळणार थेट १ लाख रुपये? कृषी उपकरणांसाठी सरकार करणार मदत? मोठी माहिती समोर

Tuesday, 13 October 2026, 15:23
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp