Thursday, November 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ठेकेदाराचे आश्वासन हवेतच! इंद्रायणी नदीतील राडारोडा जैसे थे

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 12 November 2026, 14:51

देहूगाव: भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही इंद्रायणी नदीपात्रात टाकण्यात आलेला बांधकामाचा राडारोडा अद्याप हटवण्यात आलेला नाही. यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने देहू नगरपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

देहू नगरपंचायत हद्दीतील साई चौक ते वडाचा माळ या परिसरातील पुलाजवळ जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर नदीपात्रात साचलेले दगड, माती आणि बांधकामाचे अवशेष काढणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराने अद्याप हा राडारोडा हटवलेला नाही. ठेकेदाराने 15 दिवसांत साफसफाई करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही परिस्थितीत बदल झालेला नाही.

यापूर्वी नगरपंचायतीने संबंधित ठेकेदाराला नदीपात्र स्वच्छ करून पूर्ववत करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही काम झाले नाही. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस नदीतील पाणी कमी झाल्यानंतर राडारोडा उघडपणे दिसून आला. याबाबत 30 ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रातील राडारोडा पाण्याखाली गेला.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नदीतील बांधकामाचे अवशेष पाण्याचा प्रवाह बदलू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात किंवा नदीत पाणी सोडल्यानंतर येलवाडी परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.

नगरपंचायतीने नोटीस देऊनही कारवाई न झाल्याने ठेकेदाराला अभय दिले जात आहे का, असा सवाल नागरिक करत आहेत. आता प्रशासन संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करणार का आणि नदीपात्रातील राडारोडा कधी हटवणार, याकडे देहूकरांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ठेकेदाराचे आश्वासन हवेतच! इंद्रायणी नदीतील राडारोडा जैसे थे

Thursday, 12 November 2026, 14:51

पुण्यात फटाक्यांच्या वादातून हिंसक थरार!वडिलांना वाचवण्यासाठी धावली अन् हल्लेखोरांनी डोक्यावरच केला वार

Thursday, 12 November 2026, 14:36

अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार; सिंहगड संवर्धनासाठी ४० कोटींचा निधी मंजूर

Thursday, 12 November 2026, 14:33

दिवाळी संपली अन् चिंता वाढली! फटाक्यांच्या धुराने मुंबई-पुण्यासह दिल्लीची हवा विषारी; प्रदूषणात मोठी वाढ

Thursday, 12 November 2026, 14:10

“वेळ आल्यावर सर्व स्पष्ट होईल…” राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Thursday, 12 November 2026, 13:35

महात्मा फुले स्मारकाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; 300 कोटींचा निधी मंजूर, भूसंपादन लवकरच

Thursday, 12 November 2026, 13:13
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp