मुंबई: राज्यात (Agricultural Crisis) अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने आता शेतकऱ्यांच्या कर्जाच्या वसुलीला थेट 1 वर्षांची स्थगिती देण्याचे आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पूर आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत. त्यांची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता सर्व बँकांना, विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकांना, स्पष्ट आदेश दिले असून यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना आता यंदा कर्ज भरावे लागणार नाही, ज्यामुळे त्यांना पुढील वर्षीपर्यंत मुदत मिळाली आहे.
राज्य सरकारने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा कर्जवसुली स्थगितीचा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरला आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.







