बीड : बीड जिल्ह्यामध्ये भयंकर पडलेला दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असतानाच शेतकऱ्याने मेहनतीने साठवलेले विहिरीतील पाणी अज्ञात लोकांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या साक्षाळ पिंपरी येथील त्रिंबक काशीक नामद शेतकऱ्यांच्या विहिरीमधील चक्क 6 टँकर पाणी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडमध्ये असणाऱ्या दुष्काळाच्या सावटाने हवालदील झालेल्या शेतकऱ्याने गेल्या दोन महिन्यापूर्वीच आपल्या शेतातील सहा सरस असलेल्या विहिरीमध्ये अडीच परस पाणी साठवून ठेवलं होतं. मात्र काही अज्ञात चोरट्याने शेतातील विद्युत पेटीच लॉक तोडून आणि मोटर चालू करून बांधावरील मुख्य विहिरीतील पाणी चोरलं आणि पूर्ण विहीर खाली केली.
दुष्काळाच सावट असताना शेतकऱ्यांने मेहनतीने साठवलेलं विहिरीतील पाणी चोरीला गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.







