पुणे : मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पडताळणी प्रक्रियेबाबत राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील आकडेवारीनुसार, सुमारे 2.07 कोटी मतदारांनी अद्याप गणना प्पत्र जमा केलेले नाही. त्यामुळे आगामी प्रारूप मतदारयादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार 90 मतदारसंघांत मतदार धोक्यात आले आहेत.

मुंबई शहरातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज प्राप्त झालेले नाहीत. कुलाबा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे सुमारे 47 टक्के मतदारांची नावे वगळली जाण्याचा अंदाज आहे.तसेच पिंपरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला आणि हडपसर या भागांत 40 ते 45 टक्के मतदारांनी प्रपत्र सादर न केल्याचे समोर आले आहे.

ठाणे आणि नागपूरमधील अनेक मतदारसंघांवरही याचा परिणाम दिसून येत आहे.विरोधी पक्षांनी या मोहिमेवर आक्षेप घेत विरोधकांशी संबंधित मतदारांची नावे कमी केली जात असल्याचा आरोप केला आहे. तर प्रशासनाच्या माहितीनुसार, केवळ नागपूर विभागातच सुमारे 23 हजार मृत मतदारांची नोंद आढळली आहे.

जर तुम्हाला मतदार यादीतील तुमचे नाव, मतदान केंद्र किंवा अर्जाची स्थिती तपासायची असेल, तर अधिकृत सरकारी पोर्टलचा वापर करा:आपली माहिती आणि नाव शोधण्यासाठी भारत निवडणूक आयोग मतदार सेवा पोर्टल ला भेट द्या. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करण्यासाठी राष्ट्रीय मतदार माहिती शोध सेवा वापरा.







