Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पारंपारीक वाद्य, फेटे अन् फुलांचा वर्षाव; जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 June 2025, 9:20

प्रतिनिधी: युनूस तांबोळी

शिरूर: तडमsss तडमsss ताशा अन सुरेल आवाजात बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळा, फुले आणि फुंग्यांनी सजलेली बैलगाडी त्यातच चिमुकल्यांना फेटे परिधान करून फुलांच्या वर्षावात निघालेली मिरवणूक, या काळात आकाशात काळ्या ढंगानी गर्दी करत मध्येच बरसणाऱ्या मान्सून सरीने चिमुकल्याचे होणारे स्वागत, त्यातच कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील काळूबाई नगर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने ताशा वाद्यावर ठेका धरत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचे शाळेच्या पहिल्या दिवशी अनोखे स्वागत केले.

कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थाचे फेटे व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. काळुबाई नगर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक कैलास पडवळ यांनी पारंपारिक बैलगाडी सजवून नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली. शिक्षक बाबाजी मेचे यांनी ताशा वर ठेका धरत मिरवणूकीत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या अनोख्या मिरवणूकीचे  पालक आणि ग्रामस्थांनी हळदी कूंकू आणि फुलांच्या वर्षावाने स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी इचके, श्यामल इचके, सुधीर पडवळ, दिलीप इचके, योगेश पडवळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कवठे येमाई ( ता. शिरूर ) गावठाण जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक केंद्र शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पाहिलीत २२ विद्यार्थ्यांचे फेटे व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश पोळ होते. केंद्र प्रमुख सखाराम फंड यांनी नवीन शैक्षणिक वर्ष २०२५/२६ मधील शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तके,शालेय कपडे, बूट वाटप करण्यात आले. सरपंच ज्योती मुंजाळ, शाळा समितीच्या उपाध्यक्ष डॉ.आरती उचाळे,अर्चना देवकर, डॉ. संतोष उचाळे, भाऊसाहेब घोडे, पांडुरंग भोर, नवनाथ सांडभोर, भरत रोडे, माजी प्राचार्य संजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुक्याच्या बेट भागात जिल्हा परिषद शाळांचा या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस होता. नव्याने दाखल विद्यार्थी व पालक यांची शाळेत गर्दी पहावयास मिळाली. नवीन दप्तर तसेच शैक्षणिक साहित्यांच्या खरेदीसाठी दुकांनात गर्दी पहावयास मिळाली. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून नव्याने गणवेषाचे वाटप झाले. त्या बरोबर विद्यार्थ्यांना माध्यान्य भोजनाची सुवीधा करून देण्यात आली होती.

 

शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी अनोखा असतो. शाळेत जाण्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असणारी नाराजी दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत होणारे स्वागत ही अतीशय महत्वाची गोष्ट आहे. या मधून शिक्षकांनी राबवलेली कल्पकता दिसून येते. नुकताच मराठी शाषेला मिळालेला अभिजात दर्जा लक्षात घेता मराठी शाळेकडे विद्यार्थाचे होणारे प्रवेश देखील महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा प्राथमिक दर्जा सुधारल्यास त्याचा भविष्यात मराठी भाषेला अधिक महत्व प्राप्त होईल.
संजय चौधरी माजी प्राचार्य शिरूर

 

पुर्वी शिक्षणाबाबत पालकांमध्ये अज्ञान होते. मात्र इंग्रजी माध्यमांनी केलेल्या जाहिरातीमुळे पालकांमध्ये शिक्षणाबाबत जागृती झाली आहे. सध्याच्या काळात शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत देखील गुणवत्ता पुर्ण शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. संगणक, विविध उत्तेजनार्थ परिक्षा, पुणे जिल्ह्या परिषदेच्या माध्यमातून वैयक्तिक , सांघिक होणारे खेळ यातून मनोरंजनातून दिले जाणारे शिक्षण महत्वाचे मानले जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा व पालकांची आवड वाढली आहे.
दामुआण्णा घोडे माजी सरपंच टाकळी हाजी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daily Horoscope: आजचा सोमवार कोणासाठी भाग्यशाली? नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांत कोणाला मिळणार यश; वाचा 12 राशींचे भविष्य

Monday, 16 November 2026, 7:30

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08
Next Post

ग्राहकांचे बजेट कोलमडले; पिंपरी बाजारात भाज्यांचे दर चढेच, मेथी ५०, कोथिंबीर ३० रुपयांवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp