Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये शेताच्या बांधावर फुलला ‘ॲपल’चा गोडवा, सफरचंदाच्या बीपासून चक्क फळधारणा!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 August 2026, 16:33

लोणी काळभोर : थंड हवामानात येणारे फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सफरचंदाची उष्ण हवामानाच्या लोणी काळभोरमध्ये चक्क फळधारणा झाली आहे. आठवडे बाजारातून खाण्यासाठी आणलेल्या सफरचंदाच्या बीपासून सुरू झालेला हा छोटासा प्रयोग तब्बल नऊ वर्षांच्या संगोपनानंतर फळधारणेपर्यंत पोहोचला आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील शेतकरी ज्ञानेश्वर दत्तात्रेय काळभोर यांच्या शेताच्या बांधावर लावलेल्या या सफरचंदाच्या झाडाला सध्या फळे लागली असून, हा प्रयोग परिसरातील शेतकरी आणि निसर्गप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.

ज्ञानेश्वर काळभोर यांच्या कुटुंबाने सुमारे नऊ वर्षांपूर्वी आठवडे बाजारातून खाण्यासाठी सफरचंद आणले होते. सफरचंद खाल्ल्यानंतर त्यातील बी आपण लावून पाहूया, त्यातून आपल्या परिसरात झाड उगवते का, असा सहज कुतूहलाचा विचार त्यांची मुलगी आणि निसर्गप्रेमी स्नेहल यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी सफरचंदाच्या बिया कोकोपीटमध्ये रुजवण्यासाठी ठेवल्या.

विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांत या बियांमधून कोंब बाहेर आला. कोंब फुटल्याचे पाहून कुटुंबातील सर्वांनाच आनंद झाला. त्यानंतर हे रोप एका कुंडीत शेणखत टाकून लावण्यात आले. रोपाची योग्य पद्धतीने काळजी घेत त्याला सुरुवातीच्या काळात सकाळी सुमारे एक तास सेमीशेडमध्ये ठेवण्यात येत होते. त्यानंतर दिवसभर सावलीत ठेवून त्याची निगा राखली जात होती. हळूहळू या रोपाची वाढ होऊ लागली. रोप मोठे झाल्यानंतर ते शेताच्या बांधावर लावण्यात आले. त्यानंतर या झाडाची सातत्याने देखभाल करण्यात आली. योग्य निगा, पाणी आणि काळजी घेत हे झाड चांगले वाढत गेले. अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या झाडाला सफरचंदाची फळे लागली आहेत.

सफरचंद हे प्रामुख्याने थंड आणि विशिष्ट हवामानात घेतले जाणारे फळपीक मानले जाते. त्यामुळे हवेली तालुक्यासारख्या तुलनेने उष्ण हवामानाच्या परिसरात सफरचंदाच्या झाडाला फळधारणा होणे ही निश्चितच कुतूहलाची बाब ठरली आहे. स्नेहल यांनी केवळ कुतूहलापोटी सफरचंदाची बी रुजवली. त्या छोट्याशा प्रयोगातून तयार झालेले रोपटे आज मोठ्या झाडात रूपांतरित झाले असून त्याला फळे लागली आहेत. त्यामुळे ‘प्रयोग केला आणि यश मिळाले’ याचा आनंद काळभोर कुटुंबाला आहे. या झाडाला लागलेल्या सफरचंदांची संख्या, त्यांचा आकार, चव आणि गुणवत्ता याबाबत पुढील काळात अधिक निरीक्षण केले जाणार आहे. हवामानाशी जुळवून घेत या झाडाची वाढ कशी होते आणि दरवर्षी फळधारणा होते का, याकडेही लक्ष दिले जाणार आहे.

 

शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता

हवेली तालुक्यातील उष्ण हवामानात सफरचंदाच्या झाडाला फळधारणा झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. एका घरगुती प्रयोगातून तयार झालेले हे झाड भविष्यात सफरचंद लागवडीच्या दृष्टीने काही शक्यता निर्माण करते का, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. मात्र केवळ एका झाडाला फळधारणा झाली म्हणून या परिसरात व्यावसायिक पातळीवर सफरचंदाची लागवड यशस्वी होईल, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. त्यासाठी विविध जाती, हवामान, माती, पाण्याची उपलब्धता आणि सातत्यपूर्ण उत्पादन यांचा कृषी तज्ज्ञांकडून अभ्यास होणे गरजेचे आहे.एका सफरचंदाच्या बियेतून सुरू झालेला हा छोटासा प्रयोग आज शेताच्या बांधावर फळांनी बहरला असून, ‘प्रयोग करा, निसर्गाला संधी द्या’ असा संदेशच या झाडाने दिला आहे.

“खाण्यासाठी आणलेल्या सफरचंदाच्या बिया सहजपणे रुजवून पाहूया, या कुतूहलातून हा प्रयोग सुरू केला. बियांना कोंब फुटल्यानंतर रोपाची सातत्याने काळजी घेतली. अनेक वर्षांच्या संगोपनानंतर आज त्याच झाडाला सफरचंद लागलेले पाहून खूप आनंद होत आहे. उष्ण हवामानातही झाडाला फळधारणा झाल्याने हा प्रयोग आमच्यासाठी विशेष ठरला आहे. भविष्यात या झाडाची वाढ आणि फळधारणा कशी होते, याचे निरीक्षण करून हा प्रयोग सफरचंद लागवडीसाठी कितपत उपयुक्त ठरू शकतो, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.”
– स्नेहल, लोणी काळभोर, ता. हवेली

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43

मान्सूनच पुन्हा जोरदार कमबॅक! मुसळधार पावसाचा हायअलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

Friday, 25 September 2026, 7:27

अनंत चतुर्दशीला बाप्पाची खास कृपा! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मोठ्या घडामोडी

Friday, 25 September 2026, 7:12

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59
Next Post

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांचा एल्गार!गुडलक चौकात नागरिक एकवटले ,डीजे बंद करा अन्यथा....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp