पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. आमदार राजू खरे यांनी शिवजयंती निमित्त शिंदे सेनेचे भरत गोगावले यांना कार्यक्रमाला बोलवले होते. यानिमित्त ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवरून आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच डावलण्यात आल आहे.. या बॅनर वरून शरद पवार आणि त्यांची तुतारी गायब करून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत शेठ गोगावले यांचा फोटो लावण्यात आला आहे.. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे..

राज्यात शिंदेंच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत एका बाजूला ठाकरेंचे माजी आमदार नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने धनुष्यबाण हाती घेत असताना आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या विद्यमान आमदारांनेच लावलेल्या बॅनर वरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि चिन्ह तुतारी यांना डावलून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.. आता या बॅनर मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला असून राजू खरे यांच्या मनात नेमकं चालले तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मोहोळचे आमदार राजू खरे यांनी यापूर्वी मी तुतारी वाला नसून कट्टर शिवसैनिक असल्याचा वक्तव्य केलं होतं… त्यानंतर आता त्यांनी पंढरपूर आणि मोहोळमध्ये लावलेल्या बॅनरवर शरद पवार आणि तुतारी डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांचा फोटो लावल्याने आता ते शिंदे गटाच्या वाटेवर जाणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत…








