Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rule Change : उद्यापासून खिशाला झळ..! गॅस, पेट्रोल-डिझेल, बँकिंग ते कारच्या किमतीत मोठे बदल ; जाणून घ्या 5 महत्त्वाचे नवे नियम..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 31 May 2026, 17:02

Rule Change : पुणे, : मे महिन्याचा आज शेवटचा दिवस असून उद्यापासून म्हणजेच १ जूनपासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर, बँकिंग व्यवहारांवर आणि वाहन खरेदीवर होणार आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतींपासून ते पेट्रोल-डिझेलवरील शुल्क, बँकिंग नियम आणि कारच्या वाढलेल्या किमतींपर्यंत अनेक बदलांची अंमलबजावणी होणार आहे.

१) एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदलाची शक्यता
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलेंडरचे नवे दर जाहीर करतात. त्यामुळे १ जून रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांची पडताळणी करण्यात येत असून नियमांचे पालन न केल्यास एलपीजी कनेक्शन रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२) पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवर नवे शुल्क
१ जूनपासून पेट्रोल, डिझेल आणि एअर टर्बाइन फ्युएल (ATF) यांच्यावरील निर्यात शुल्कात बदल होणार आहे. याचा परिणाम इंधन क्षेत्रासह हवाई प्रवासाच्या खर्चावरही होऊ शकतो. त्यामुळे बाजारातील इंधन दरांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

३) एचडीएफसी बँकेच्या नियमांमध्ये बदल
एचडीएफसी बँकेने चालू खातेधारकांसाठी लहान नोटा आणि नाण्यांच्या रोख ठेवींवर नवीन मर्यादा आणि शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि व्यावसायिक ग्राहकांनी नव्या नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.

 

४) सौर पॅनेलसाठी नवे निकष
१ जूनपासून सौर पॅनेल क्षेत्रात ‘ALMM List-II’ लागू होणार आहे. सरकारी योजना आणि अनुदानित प्रकल्पांमध्ये केवळ मान्यताप्राप्त उत्पादकांची उत्पादने वापरणे बंधनकारक राहणार आहे. यामुळे सौर उपकरणांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

५) मारुतीच्या गाड्या महागणार
कार खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठीही धक्का आहे. मारुती सुझुकीने आपल्या विविध मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली असून १ जूनपासून या नव्या किमती लागू होणार आहेत. काही मॉडेल्सच्या किमतीत तब्बल ३० हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.

दरम्यान, एकूणच, १ जूनपासून लागू होणारे हे बदल सर्वसामान्यांच्या खर्चावर परिणाम करणारे ठरणार असून नागरिकांनी नव्या नियमांची माहिती घेऊन आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवर धूम; १० दिवसांत ३०९ कोटींची कमाई

Tuesday, 13 October 2026, 22:08

पुण्यात वर्षभरापूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा! वानवडी पोलिसांची कारवाई; ५ आरोपी अटकेत,६ लाखांचे सोने जप्त

Tuesday, 13 October 2026, 21:36

बारामतीतील घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश! महिला आरोपीकडून ५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Tuesday, 13 October 2026, 20:58

अन् त्याने स्वतःच्याच लहान बहिणीच्या शरीराचे लचके तोडले! लग्नाचं आमिष दाखवलं, कोवळ्या वयाचा फायदा घेत वारंवार अत्याचार; बहीण गर्भवती राहताच…

Tuesday, 13 October 2026, 20:53

पुण्यात चिमुकल्या श्वानासोबत रिक्षाचालकाचं क्रूर कृत्य! बेल्टने मारलं, भिंतीवर आपटलं नंतर चौथ्या मजल्यावरून खाली फेकत…

Tuesday, 13 October 2026, 19:29

दिल्लीच्या राजकारणात भूकंप! मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरफार होण्याच्या चर्चा; केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा…

Tuesday, 13 October 2026, 19:19
Next Post

मस्साजोग येथे धनंजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल; कारण आले समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp