Tuesday, September 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सेवानिवृत्त पोलिसाची जमीन मोजणीच्या नावाखाली 91 हजारांची फसवणूक; उरुळी देवाची येथील प्रकार

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 15 September 2026, 14:21

फुरसुंगी : जमीन मोजणी करून देण्याचे आश्वासन देत एका व्यक्तीने सेवानिवृत्त पोलिसाची तब्बल 91 हजार 710 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उरुळी देवाची (ता. हवेली) परिसरात समोर आला आहे. मोजणीच्या नावाखाली पैसे घेतल्यानंतर प्रत्यक्षात कोणताही अर्ज किंवा चलन भरले नसल्याचे समोर आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पैसे परत करण्यासाठी दिलेले दोन धनादेशही वटले नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी धर्मराज शंकर जाधव (वय 65, रा. मारुंजी, मुळशी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल उत्तम पठारे (रा. होळकरवाडी, ता. हवेली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे पोलिस खात्यातून 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत.

जाधव हे उरुळी देवाची तलाठी कार्यालयात त्यांच्या जमिनीच्या पोटहिस्सा मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठी 14 नोव्हेंबर 2025 रोजी गेले होते. त्यावेळी राहुल पठारे याने आपण यापूर्वी अनेक मोजणी अधिकाऱ्यांसोबत काम केले असून, ओळखीच्या माध्यमातून 15 दिवसांत जमीन मोजणी करून देण्याचे आश्वासन दिले.

या आश्वासनावर विश्वास ठेवून जाधव यांनी 14 ते 26 नोव्हेंबरदरम्यान विविध कारणांसाठी पठारे याच्या बँक खात्यावर एकूण 91 हजार 710 रुपये ऑनलाइन पाठविले. मात्र, त्यानंतर वारंवार तारीख सांगूनही प्रत्यक्ष मोजणी झाली नाही. मोजणी कार्यालयात चौकशी केली असता जाधव यांच्या नावाने कोणताही मोजणी अर्ज किंवा चलन भरलेले नसल्याचे समोर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पठारे याने पैसे परत करण्याचे आश्वासन देत 50 हजार आणि 41 हजार रुपयांचे दोन धनादेश दिले. मात्र, दोन्ही धनादेश वटले नाहीत.

 

पैसे व कागदपत्रांची मागणी केल्यावर पठारे याने वारंवार घरी येऊ नका, अन्यथा जीव देईन, अशी धमकी फिर्यादी जाधव यांना दिली आहे. तसेच जाधव यांच्या जमिनीवरील नावाचा फलक तोडून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात पठारे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 316(2),318(4),324(4),351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी आणि साखर कारखान्यांसाठी मोठा निर्णय; ७ महत्त्वाच्या मुद्द्यांना मंजुरी

Tuesday, 15 September 2026, 15:02

पोलिस होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! 8100 पोलिसांची मोठी भरती; अर्जाची तारीखही आली समोर

Tuesday, 15 September 2026, 15:01

भूत उतरविण्याच्या नावाखाली महिलेला मारहाण; जादूटोण्याला विरोध करताच तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाड! यवत पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा

Tuesday, 15 September 2026, 14:54

‘तुम्ही भिल्ल जातीचे हाय’ म्हणत जातिवाचक शिवीगाळ! ऊसतोड मजुराच्या कुटुंबाला डांबून राबवलं; दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Tuesday, 15 September 2026, 14:35

सायरनचा इशाराही धुडकावला; मोहोळ यांच्या ताफ्यात दुचाकी घुसवण्याचा प्रयत्न

Tuesday, 15 September 2026, 14:35

135 गुणांचे 68! एमपीएससीच्या ‘गुणां’चा हा कसला खेळ? एका उत्तरपत्रिकेतील 67 गुणांची तफावत; पारदर्शकतेचा मुखवटा उतरवण्याची वेळ!

Tuesday, 15 September 2026, 14:34
Next Post

“आरोपींना तातडीने बेड्या ठोका!” जनता दरबारात सुनेत्रा पवारांचे पुणे पोलीस आयुक्तांना सक्त आदेश; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp