Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात; बसची ट्रॅक्टर ट्राली अन् दुचाकीस्वाराला धडक

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Friday, 24 November 2023, 17:23

सागर जगदाळे

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नंबर १ च्या हद्दीत गुरुवारी (ता. २३) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रालीला एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकासह सेवा रस्त्याने जाणाऱ्या तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातास बसचालक विनायक सोपान गायकवाड (वय ४५ वर्षे, रा. काझी करबस, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) याला कारणीभूत ठरवून, त्याच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बसचालक त्याच्या ताब्यातील एसटी बस (क्र. एम.एच १३/सी यु/८१२५) पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने घेऊन जात होता. त्यावेळी पुणे सोलापूर रस्त्याने भिगवणकडून इंदापूरच्या दिशेने चाललेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने चालक आबा करे यांना गंभीर मार लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

 

त्यानंतर एसटी बस ही पुणे ते सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्याने पुणे सेवा रस्त्यावर खाली येऊन पल्सर मोटारसायकलवरून (क्र. एम.एच. ४२ बी.एच. ९७९७) डाळजकडे निघालेले रवींद्र रावसाहेब जगताप यांना धडक दिली. त्यानंतर एसटी बस उलटली व त्याखाली ते चिरडले गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बसमधील प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात निलेश रामदास कोळी (वय ३३, रा. डाळज. नं. १, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

ॲम्बुलन्सने दिली ‘आपुलकीची सेवा’

दरम्यान, अपघातात जखमींची संख्या जास्त असल्याचा निरोप मिळाल्यानंतर ‘आपुलकीची सेवा’ ॲम्बुलन्सचे मालक केतन वाघ यांनी आपल्या मालकीच्या तिन्ही अॅम्बुलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले. एसटी बसमधील जखमींना भिगवणमधील वेगवेगळ्या दवाखान्यांत दाखल केले. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत झाली. माणुसकी दाखवून वेळेला केलेल्या मदतीमुळे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्सचालक केतन वाघ यांचे आभार मानले.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05
Next Post

Sushma Andhare : जरांगे पाटलांचा तोल घसरतोय; छगन भुजबळ जरांगे पाटलांच्या वादात सुषमा अंधारेंची उडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.