Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पुणे प्राईम न्यूज’चा दणका; नांदूर येथील विशाखा इंडस्ट्रीजच्या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’ला अखेर जाग, अर्धवट कारवाईवर सहआयुक्तांचे ताशेरे

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 6 August 2026, 18:44

लोणी काळभोर : ‘विशाखा इंडस्ट्रीज’च्या अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएकडून केवळ फेन्सिंग हटवून पाडकामाचा देखावा करण्यात आला असून प्रत्यक्ष अनधिकृत बांधकामाला अभय देण्यात आले आहे, असा गंभीर आरोप करत दैनिक पुणे प्राईम न्यूजने ३१ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर अखेर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाला जाग आली असून, अर्धवट राहिलेल्या कारवाईवर स्वतः ‘पीएमआरडीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नांदूर (ता. दौंड) येथील मे. विशाखा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कथित अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा कधी चालणार? असा प्रश्न आता संपूर्ण जिल्ह्यात उपस्थित होत आहे.

‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिम्मत खराडे यांनी विकास परवानगी विभागाला पाठविलेल्या अधिकृत पत्रात “सदर ठिकाणची कारवाई अर्धवट झाली असून ही बाब ‘पीएमआरडीए’च्या कार्यपद्धती आणि प्रशासनाच्या प्रतिमेस मारक आहे,” असे स्पष्ट नमूद केले आहे. विशेष म्हणजे, हा उल्लेख अधिकृत पत्रात करण्यात आल्याने यापूर्वी झालेल्या कारवाईबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पत्रानुसार, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित सहायक महानियोजनकार हेच कारवाई करण्यास सक्षम अधिकारी असून, यापुढे कारवाईचे संपूर्ण नियोजन, यंत्रसामग्री, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक पत्रव्यवहार विकास परवानगी विभागानेच स्वतःच्या स्तरावर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास मनुष्यबळासाठी अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाची मदत घ्यावी, असेही आदेशात नमूद आहे.

यापूर्वी २८ जानेवारी २०२६ रोजी संयुक्त कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही संबंधित बांधकाम पूर्णपणे हटविण्यात आले नसल्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पोहोचला. त्यानंतरच सहआयुक्त खराडे यांनी कठोर शब्दांत पत्र काढून अर्धवट कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नांदूर-टिळेकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी सातत्याने अनधिकृत बांधकामाविरोधात आवाज उठविला असून, प्रशासनाने मोठ्या उद्योगसमूहासमोर नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. आता ‘पीएमआरडीए’च्या अधिकृत पत्रामुळे त्या आरोपांनाही नवे बळ मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

 

दरम्यान, आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे. ‘पीएमआरडीए’केवळ पत्रे आणि आदेशांपुरतीच कारवाई करणार, की विशाखा इंडस्ट्रीजच्या कथित अनधिकृत बांधकामावर प्रत्यक्षात बुलडोझर चालवून नियम सर्वांसाठी समान असल्याचे दाखवून देणार? जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी याच उत्तराची प्रतीक्षा करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

Sunday, 27 September 2026, 18:32

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32
Next Post

Gen Z साठी खुशखबर! फडणवीस सरकारचे मोठे गिफ्ट; राज्यभर 1000 रोजगार मेळाव्यांची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp