Pune Politics: स्थानिक स्वराज संस्थांचा (Local Body Election) निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राजकीय वेग वाढला असून ठिकठिकाणी नेत्यांमध्ये उत्साह आणि धाकधुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रावादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharadchandra Pawar) पक्षाचे उमेदवार नितीन तावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळाच एकच चर्चा रंगली आहे. (Pune Politics)

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील माळेगाव बु, नगरपंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार नितीन तावरे यांच्यावर हल्ला झाला. तीन ते चार जणांनी मिळून तावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. एवढच नव्हे तर, या घटनेत ते जखमी झाले आहे. आमच्या विरोधात पॅनेल उभे करतोस काय? कसा निवडणूक लढवतो तेच पाहतो, अशी धमकी देत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले.
हेही वाचा- Viral News: लग्नानंतर एक्स-गर्लफ्रेंडची जबरदस्ती किस…; संतापलेल्या तरुणीने असं काही केलं की…
शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मारहाण करण्यात आल्याने मालेगावात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला झाल्यानंतर खासगार सुप्रिया ताई सुळे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे हा सामान्य नागरिकांचा अधिकार आहे. या अधिकारावरच आक्रमण करून नागरिकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आहे. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही सरकारला विनंती करतो की, हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारावाई झाली पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी एक्सवर ट्वीट केले आहे.
हल्ल्यात जखमी झाल्यानंतर नितीन तावरे थेट पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणानंतर मालेगाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
हेही वाचा- Maharashtra Politics: महायुतीत नवा राजकीय भूकंप? नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस-पवारांची बैठक; एकनाथ शिंदे थेट अमित शहांच्या भेटीला…





