Pune News : पुणे, : पुणे शहराला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून, विषारी दारू प्राशन केल्यामुळे अवघ्या २४ तासांत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि पिंपळे गुरव परिसरात ८ जणांचा, तर हडपसर परिसरात ५ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पुण्यातील बेकायदेशीर दारू व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. Pune News

प्राथमिक माहितीनुसार, मृतांनी विषारी दारूचे सेवन केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणाचा तपास पोलीस आणि आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये मजूर, हातावर पोट असलेले कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. Pune News
फुगेवाडी-पिंपळे गुरव परिसरातील मृतांची नावे
पांडुरंग फुगे, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, राजू रजपूत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई, आनंद निकाळजे Pune News
हडपसर परिसरातील मृतांची नावे
राहुल शरद क्षीरसागर (वय ४५, पांढरे मळा, हडपसर), विजय भूकुरलाल शर्मा (वय ४५, ससाणे नगर, हडपसर), अरुण डाडर, अशोक रमेश चव्हाण (काळेपडळ), विजय भूकुरलाल शर्मा Pune News
दरम्यान, या घटनेत आणखी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सुभाष डिगीकर यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये, तर अक्षय अवसरमल यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. Pune News
मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत विषारी दारू बनविणारा आणि पुरवठा करणारा आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली आहे. आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याविरोधात यापूर्वीही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून, पोलीस तपास सुरू आहे. Pune News
दारूबंदी आणि अवैध धंद्यांवर प्रश्नचिन्ह
पुण्यासारख्या मोठ्या शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायामुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “विषारी दारू शहरात पोहोचलीच कशी?”, “स्थानिक पोलिसांना याची माहिती नव्हती का?”, “अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई का झाली नाही?” असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. Pune News
या दुर्दैवी घटनेनंतर पोलिस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. Pune News







