Pune News: भिगवण (ता. 20) — जि. प. प्राथमिक शाळा, भिगवण येथील विद्यार्थी हुजेफ बक्षी याने पुण्यात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवातील कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून भिगवणचे नाव उज्ज्वल केले. (Pune News)

विद्यार्थ्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भिगवणचे माजी उपसरपंच मुमताज जावेद शेख यांनी स्वतःच्या मानधनातील 50% म्हणजेच 2,500 रुपये प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून प्रदान केले. स्वतःची आर्थिक परिस्थिती साधी असूनही विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती करावी, भिगवणचे नाव उंचवावे या हेतूने त्यांनी हा दानशूर उपक्रम राबवला. सामाजिक बांधिलकीचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे उपस्थितांनी सांगितले.


याच कार्यक्रमात रोटरी क्लबचे रियाज शेख यांनीही 10,000 रुपये रोख बक्षीस देऊन हुजेफचा गौरव केला.
कार्यक्रमात अशोक शिंदे, संजय रायसोनी, दीपिका क्षीरसागर, अमृता गायकवाड, तुषार क्षीरसागर, जावेद शेख, रियाज शेख यांनी मनोगत व्यक्त करत हुजेफला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुमताज शेख, ऍड. सुरज खटके, तैय्यब शेख, फिरोज बक्षी, कपिल लांडगे, शहाजी गाडे, प्रवीण गाडे, मोबीन मत्तीशे, अमोल देवकाते, मोसिन सातारे, लतिफ तांबोळी, मजहर शेख, तोहित सय्यद, उमर बागवान, तसेच शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक सचिन गायकवाड यांनी केले.






